अलौकिक भेट!! ‘माझ्या घरी रामाची ही पहिली मूर्ती…’; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री राधिका देशपांडे सोशल मीडियावर फार सक्रिय असते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे राधिका प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने अरुंधतीची मैत्रिणी देविकाचे पात्र साकारले होते. यानंतर गेल्या काही महिन्यांपासून राधिका ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकामूळे चर्चेत आली आहे. आताही तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री राधिका देशपांडेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना यात तिने भगवान श्री रामांच्या एका मूर्तीचा फोटो शेअर केला आहे. सोबत या मूर्तीमागील कहाणी सांगताना तिने ही पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चांगली चर्चेत आली आहे. यामध्ये तिने लिहिलं आहे कि, ‘काल इंस्टा कनेक्ट मैत्रिणीला सोलापूरला भेटले. तिने श्री रामाची मूर्ती माझ्यासाठी आणली. माझ्या घरी रामाची ही पहिली मूर्ती. गेले एक महिना मी मैथिली ठाकूरच गाणं “मेरी झोपड़ी के भाग आज जाग जायेंगे राम आयेंगे।” गुणगुणते आहे’.

‘योगायोग असा की मृण्मयीच्या घरी रामाचं मंदिर आहे आणि रामनवमी मधे नऊ दिवस मोठ्ठा कार्यक्रम असतो. दिवाळीच्या दिवस आणि राम घरी येणे निव्वळ योगायोग समजावा का आणखीन काही…? ”सियावर रामचंद्र की जय” ह्या नाटकाचा प्रयोग लवकरच प्रेक्षकाच्या भेटीस येईल. तेव्हा ह्या मूर्तीचे दर्शन घ्यायला नक्की या’. असे राधिका देशपांडेने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. ज्यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. राधिका देशपांडेच्या या पोस्टवर मृण्मयी राऊतने कमेंट करत लिहिलंय कि, ‘धन्यवाद राधिका ताई. ती मूर्ती तुला मिळावी ही श्री प्रभू रामचंद्रांचीच इच्छा. तुला तुझ्या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा. नाटक पाहायला आम्ही सगळे नक्की येऊ’.