‘नात्यास नाव आपुल्या…’; लग्नाच्या गोड क्षणांसह अमृताने शेअर केली नवऱ्यासाठी खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात भेट झाली.. मग मैत्री झाली आणि अखेर लग्न बंधनात अडकले. आता हे नव्याने सांगण्याची गरज नाही कि आपण प्रसाद जवादे अन अमृता देशमुखबद्दल बोलत आहोत. नुकताच १८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसाद आणि अमृता यांचा विवाह सोहळा धुमधडाक्यात पार पडला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता अमृताने लग्नाच्या फोटोसह प्रसादसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख नुकतेच लग्नबंधनात अडकले असून त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अत्यंत जवळच्या नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत त्यांनी साता जन्माची गाठ बांधली.

यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि हास्य पाहण्याजोगे होते. दोघांच्या डोळ्यात एकमेकांसाठीचे प्रेम झळकत होते. अशातच आता अमृताने नवऱ्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने त्यांच्या लग्न सोहळ्यातील काही गोड क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.

‘नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही..
सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही..
ना तालराग यांच्या बंधात बांधलेला..
स्वरमेघ मंजूळांचा बरसे दिशात दाही..!’
असे कॅप्शन देत अमृताने त्यांच्या लग्न सोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून नेटकरी अमृता आणि प्रसाद हे कपल ‘मेड फॉर इच अदर’ असल्याचे म्हणत आहेत.