‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेता झळकणार ‘या’ मालिकेत; साकारणार महत्त्वाची भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपली असली तरीही मालिकेतील पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. आता ही कलाकार मंडळी नवनवीन प्रोजेक्ट्समधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहेत. या मालिकेतील वैभव म्हणजेच अभिनेता अमेय बर्वे आता स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेच्या नव्या पर्वात झळकणार आहे.

सोमवारपासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचे दुसरे पर्व सुरु झाले आहे. नुकतेच या मालिकेचे कथानक २५ वर्षांनी पुढे सरकले आहे. या नव्या पर्वात जयदीप- गौरीच्या प्रेमकहाणीचा नवा अध्याय पहायला मिळणार आहे. त्यामुळे आता मालिकेत जयदीपचा अधिराज म्हणून आणि गौरीचा नित्या म्हणून पुनर्जन्म होणार आहे.

त्यांच्या पुनर्जन्माची गोष्ट नव्या कलाकारांच्या सहभागाने पुढे जाईल. तर जुन्या पर्वातील बरेच कलाकार एक्झिट घेतील. दरम्यान ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील वैभव म्हणजेच अभिनेता अमेय बर्वे आता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

अमेय साकारत असलेली भूमिका नेमकी काय असणार आहे..? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या संदर्भातील एक पोस्ट ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्री नंदिता पाटकरने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. यात तिने लिहिलं, ‘अमेय तुला पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत आहे. गिरीजा तुला खूप सारं प्रेम…हे खूप रोमांचक असणार आहे…’. दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत अमेय बर्वेसोबत ‘रंग माझा वेगळा’मधील सौंदर्या म्हणजेच अभिनेत्री हर्षदा खानविलकर देखील महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.