मृण्मयी देशपांडेने शेअर केली ‘त्या’ खास पत्राची झलक; म्हणाली, ‘हे .. मी फ्रेम करून ठेवणार’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मृण्मयी देशपांडे अत्यंत सुंदर आणि लक्षवेधी अभिनेत्री आहे. आजपर्यंत तिने अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. यानंतर आता लवकरच सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारलेल्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात मृण्मयी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. एकीकडे या चित्रपटातबाबत प्रेक्षकवर्ग उत्सुक आहेत. तर दुसरीकडे मृण्मयी तिने साकारलेल्या भूमिका मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहे. यानिमित्त तिने एक पोस्ट शेअर केली आहे. जिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मृण्मयी देशपांडेने म्हटलं, ‘ही दिवाळी खऱ्या अर्थाने लक्षात राहील… आणि योगेश.. तुझ्याबद्दल काय बोलू…? इतक्या प्रेमाने तू सगळ्या टीमला बांधून ठेवलं आहेस.. हे पत्र मी फ्रेम करुन ठेवणार आहे… माझ्या मधे तू ललिता बाईंना पाहीलस.. आणि तुझ्यामुळे मी त्यांना सिनेमाच्या माध्यमातून भेटले… जगले… तुला फक्त thank you म्हणू शकते… आता पडद्यावरती सगळ्यांना बघायची वाट बघते आहे… ”स्वरगंधर्व सुधीर फडके” ‘. मृण्मयी या चित्रपटात ललिता देशपांडे हे पात्र साकारते आहे.

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित असून मुख्य भूमिका अभिनेते सुनील बर्वे साकारत आहेत. या निमित्ताने लेखक- दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी चित्रपटातील कलाकारांना पत्र पाठवलं आहे. त्याची झलक मृण्मयीने या पोस्टमध्ये दाखवली आहे. या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे यांच्याशिवाय सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, सुखदा खांडकेकर, धीरेश जोशी, शरद पोंक्षे ही कलाकार मंडळीदेखील महत्त्वाच्या भूमिका़ साकारताना दिसणार आहेत.