‘म्हणून मुद्दाम ..’; प्रसादने ‘तो’ खास फोटो शेअर करत अम्मूला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘चंद्रमुखी’ म्हणेजच अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अमृताचे चाहते आणि मराठी तसेच हिंदी सिनेविश्वातील कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे. आज अमृताच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकने एक खास पोस्ट शेअर केली आहे . ज्यामध्ये त्याने अमृतासोबतचा एक खास फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रसाद ओकने ‘चंद्रमुखी’ या चित्रपटासाठी अमृताची निवड केली. अमृतानेसुद्धा प्रसादचा विश्वास खरा ठरवत साकारलेली ‘चंद्रमुखी’ प्रेक्षकांच्या मनाला भावली आणि बॉक्स ऑफिसवर गाजलीसुद्धा. प्रसादने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि केवळ चित्रपट नव्हे तर गाणीसुद्धा सुपरहिट ठरली. तर आज अमृता खानविलकरच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आवर्जून एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

या फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये प्रसादने म्हटलंय कि, ‘प्रिय अमृता… असे क्षण तुझ्या आयुष्यात वारंवार येवोत… ( म्हणून मुद्दाम हा तुझा आवडता फोटो टाकतोय ) कायम अशीच प्रसन्न, हसतमुख रहा…!!! तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा. देव पूर्ण करो हीच प्रार्थना…!!! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…!!! खूप खूप खूप प्रेम…!!!’ प्रसादने दिलेल्या वाढदिवसांच्या शुभेच्छांवर अमृताने प्रतिक्रिया देताना म्हटले कि, ‘प्रसाद खुप धन्यवाद… तू माझ्यासाठी खुप स्पेशल आहेस. Thank You For Everything..’