Akash Thosar | रिंकू पाठोपाठ आकाशने देखील केली केदारनाथ यात्रा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल


Akash Thosar | मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहे ज्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ही ऑन स्क्रीन जोडी सगळ्यांना खूपच जास्त आवडते. काही वर्षांपूर्वी या दोघांनी सैराट नावाचा चित्रपट एकत्र केला होता. त्यानंतर दोघाना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्याच्या हातांना करणार एकत्र पाहायला खूप आवडते. आता पुन्हा एकदा त्यांना एकत्र कधी पाहायला मिळतील याची सगळेजण वाट पाहत आहे.

रिंकू आणि आकाश हे दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांचे विविध फोटो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवत असतात. काही दिवसापूर्वी रिंकू राजगुरू ही केदारनाथच्या यात्रेला गेली होती. या अविस्मरणीय यात्रेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सगळ्यांनाच खूप आवडले होते.

हेही वाचा – प्रिया बापटच्या आगामी हिंदी थ्रिलर सिनेमाची घोषणा; बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार

अशातच आता रिंकूनंतर आकाशने देखील केदारनाथची यात्रा केली आहे. आणि सध्या त्याचे फोटो तेथील वायरल होताना दिसत आहे. केदारनाथच्या मंदिरासमोर उभे राहून आकाशने हे फोटो काढले आहेत. आणि सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या फोटोमध्ये आकाश खूपच हँडसम दिसत आहे. फोटोमध्ये त्यांनी पांढरा टी-शर्ट कांड टोपी आणि हॅन्ड ग्लोज असे घातले आहे. आणि तिथूनच केदारनाथच्या मंदिराचा एक सुंदर असा नजारा देखील सगळ्यांना पाहायला मिळत आहे.

आकाशला निसर्गरम्य वातावरण हे खूप आवडते. हे त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून नेहमीच आपल्याला समजत अस.ते या केदारनाथच्या निसर्गरम्य वातावरणात आकाशने वर्कआउट करतानाचे व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहे.

त्याचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. सध्या आकाश आणि रिंकू हे दोघेही आपापल्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. रिंकू ही सध्या ‘झिम्मा 2’या चित्रपटात दिसत आहे आकाश हा लवकरच त्याचा एक नवीन सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.