हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांची एकुलती एक लेक श्रिया पिळगांवकर आज सिनेविश्वात अभिनयाच्या जोरावर तग धरून आहे. केवळ मराठी चित्रपट नव्हे तर हिंदी वेब सिरीजमध्ये देखील श्रियाने काम केले आहे. श्रियाने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. श्रियाचा केवळ अभिनय नव्हे तर तिचा बोल्ड अंदाज देखील सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. आताही तिचा असाच एक सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये श्रियाने जांभळ्या रंगाचा शिमरी को- ऑर्ड सेट परिधान केला आहे. ज्यामध्ये ती फारच ग्लॅमरस दिसते आहे. शिवाय यावेळी तिने फोटोशूटसाठी दिलेल्या पोज फारच कातिल होत्या. श्रियाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना फारच आवडला आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स देत तिच्या हटके अंदाजाचे कौतुक केले आहे. तसेच अनेकांनी तिच्या ग्लॅमरस लूकची वाहवाह केली आहे.
श्रिया पिळगांवकरने ‘जीक्यू मेन ऑफ द इयर 2023’ या कार्यक्रमासाठी हा लूक केला होता आणि तिचे हे सुंदर फोटो पलश वर्मा यांनी काढले आहेत. अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने तिचे वडील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्याप्रमाणेच मराठी सिनेविश्वात अभिनयाचा ठसा उमटवला आहे. शिवाय तिने ‘मिर्झापुर’, ‘ताजा खबर’, ‘गिल्टी माइंड्स’ यांसारख्या एकापेक्षा एक दर्जेदार हिंदी वेबसीरिजमध्ये काम केले आहे. त्यामुळे श्रिया आज केवळ चित्रपट सृष्टीत नव्हे तर ओटीटी विश्वातसुद्धा तिचे पाय घट्ट रोवून उभी आहे.