हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अनेक कलाकार प्रसिद्धी झोतात आले. यामध्ये अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकरचा देखील समावेश आहे. पुण्याची विनम्र अभिनेत्री अशी प्रियदर्शनीची ओळख. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात विविध प्रहसनांच्या माध्यमातून प्रियदर्शिनी प्रेक्षकांना हसवते. शिवाय तिने अभिनेता सुबोध भावासोबत ‘फुलराणी’ या चित्रपट मुख्य भूमिका देखील साकारली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना प्रियदर्शनीकडून फार अपेक्षा आहेत. अशातच प्रियदर्शनीचं लग्न ठरल्याची चर्चा सुरु झाली आहे.
त्याच झालं असं कि, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हि सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असते. यामुळे वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून ती आपल्या चाहत्यांसोबत कामासंदर्भात आणि वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करताना दिसते. पण नुकतीच तिने लग्नाबाबत शेअर केलेली पोस्ट पाहून प्रियदर्शनी लग्न करतेय.. अशी चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ‘लग्नाला ६० दिवस बाकी’ असं लिहीण्यात आलंय. याच पोस्टमुळे प्रियदर्शनी लवकर लग्न करणार असं बोललं जात आहे.
पण प्रियदर्शनीने शेअर केलेल्या पोस्टचा रोख खऱ्या आयुष्यातील लग्नाबद्दल नसल्याचे समोर आले आहे. तर सर्वांची लाडकी प्रियदर्शनी खऱ्या आयुष्यात लग्न करणार नसुन ही पोस्ट तिने तिच्या आगामी नाटक वा सिनेमाची घोषणा करण्याच्या हेतूने शेअर केली आहे. होय. ‘लग्नाला ६० दिवस बाकी’ हा प्रियदर्शनीचा आगामी प्रोजेक्ट आहे. प्रियदर्शनीने या पोस्टखाली नवरदेव आणि जानेवारी २०२४ असे हॅशटॅग वापरले आहेत. त्यामुळे प्रियदर्शनीने हटके अंदाजात या नवीन प्रोजेक्टची घोषणा केल्याचे समजत आहे. अद्याप हा नक्की काय प्रोजेक्ट आहे..? आणि यामध्ये तिच्यासोबत कोण आहे..? हे समोर आलेलं नाही.