Sukanya Mone |आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहे. ज्यांनी खूप मोठा अनुभव घेतलेला आहे.आणि ते अनेक वेळा अनेक प्रसंगावर त्यांचे मत व्यक्त करत असतात. आणि यातीलच एक अभिनेत्री म्हणजे सुकन्या मोने कुलकर्णी. त्यांनी आपल्या अभिनयाने गेले कित्येक वर्ष मराठी चित्रपट सृष्टीतील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करून त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एका मुलाखतीत सुकन्या यांनी मालिका विश्वाविषयी भाष्य केले होते जे सध्या चर्चेत आलेले आहे
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सुकन्यामुळे यांनी इंडस्ट्रीतील बदलाविषयी भाष्य केले. मालिका विश्वाला इंडस्ट्रीज दर्जा का दिला जात नाही हे देखील त्यांनी सांगितले. तसेच पीएफ, सिक लिव्ह असे काहीच मिळत नाही असे देखील त्यांनी सांगितले.
हेही वाचा – परकेपणा संपणार..? सायली- अर्जुनच्या डीनर डेटनंतर दोघांचं नातं बहरणार..? नवा प्रोमो व्हायरल
सुकन्यामुळे यांना मालिका विश्वाला इंडस्ट्रीचा दर्जा मिळत नाही असे विचारले त्यावेळी त्यांनी सांगितले की, “इंडस्ट्री नुसती नावालाच आहे. इथे पीएफसी काही मिळत नाही मोजके निर्माते आहे, जे कलाकार तंत्रज्ञानचा वापर करतात. वाहिन्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे सगळ्या युनिटला पंधरा दिवसातून एक सुट्टी दिली पाहिजे असे सुकन्यामुळे यांनी सांगितले.”
यापुढे त्या म्हणाल्या की, “सरसकट निर्मात्यांची चूक असते असं मी म्हणणार नाही. कारण नवीन निर्मात्याकडे जर निधीच नसेल तर ते तरी काय करणार? अचानकपणे कथेला वळण दिलं जातं, कलाकार सेट वेशभूषा बदलली जाते, तीन महिन्यातच मालिका बंद करायला सांगितली जाते. त्यामुळे नवीन निर्माते बिघडतात मग तो उभा कसा राहणार.”
सुकन्या मोने यांनी दिलेली ही मुलाखत सध्या चांगलीच वायरल होत आहे. सुकन्यामुळे यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडलेली आहे.