हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा सध्या धगधगता विषय झाला आहे. रिलीजपासून या सिनेमावर टीकांचा मारा होत आहे. सिनेमातील पात्रांचे कपडे, देखावे, VFX, संवाद सगळं काही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलं आहे. या सिनेमात प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत प्रभास, माता सीतेच्या भूमिकेत क्रिती सॅनॉन, रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान असे तोडीचे कलाकार असूनही सिनेमा टीकांचा मानकरी ठरला. या सिनेमात अनेक मराठी कलाकारदेखील महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. यातील हनुमानाच्या भूमिकेत लोकप्रिय मराठी अभिनेता देवदत्त नागे दिसत आहे. या भूमिकेमुळे देवदत्तवर प्रेम करणारे प्रेक्षक आज त्याच्यावर संतापले आहेत.
View this post on Instagram
अभिनेता देवदत्त नागे याने मराठी मालिका ‘जय मल्हार’मध्ये खंडेरायाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतले होते. यानंतर आदिपुरुष तो हनुमानाच्या भूमिकेत दिसणार म्हणून प्रेक्षक उत्सुक होते. मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर या सिनेमात हनुमानाच्या तोंडी जे संवाद दिले आहेत ते ऐकून प्रेक्षकांच्या संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर हे प्रेक्षक आपला संताप उघडपणे व्यक्त करत आहेत. ‘कपडा तेरे बाप का.. तेल बाप का.. और जलेगी भी तेरे बाप की..’, असे संवाद हनुमानाच्या तोंडी ऐकल्यानंतर प्रेक्षकांचा अक्षरशः हिरमोड झाला. यामुळे त्यांनी देवदत्तवर देखील आपला राग जाहीर केला आहे.
View this post on Instagram
देवदत्तनेच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर प्रेक्षकांना आपला सिनेमा किती आवडला याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट करत त्याचा उद्धार केला आहे. एकाने लिहिले आहे कि, ‘अपेक्षा खूप होत्या पण मराठी प्रेक्षकांकडून रीव्ह्यू बघून मूव्ही बघायला जायची सुद्धा इच्छा राहिली नाही. माझ्या धर्मासोबत होणारा खेळ सहन नाही करू शकत’. आणखी एकाने लिहिले, ‘आदीपुरुष ने प्रेक्षकांचा आणि हिंदू बांधवांचा घात केला!’. तर अन्य एकाने लिहिले, ‘अबे तुला शूटिंगवेळी समजल नाही का आपण कुणाचा रोल करतोय? भाषा काय बोलतोय? आता शहाणपण शिकवत फिरायला, पैसा पायी चाटतो का सगळ्यांची? निर्लज्ज माणसा तोंड दाखवत फिरू नको तू. आता लायकी नाही तुझी ती’.
तसेच आणखी एका युजरने लिहिलंय, ‘खूप वाट पहिली होती ह्या चित्रपटाची फक्त तुमच्यासाठी पण खरच तुम्ही हा चित्रपट करायला नको होता. आज सगळीकडे तुमचे नाव खराब होत आहे हे पाहून दुःख होतंय’. आणखी एका नेटकाऱ्याने लिहिले, ‘सर, खरंच तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती. साक्षात परम रामभक्त हनुमान जी असे (टपोरी) भाषेमध्ये कुणाशी बोलतील का? तुम्हाला हे पटले कसे..? त्याचे आश्चर्य वाटते’.