पूजा सावंतने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा; ‘लव्ह यू..’ म्हणत शेअर केले रोमँटिक फोटो


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पूजा सावंत हि मराठी मनोरंजनसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकतीच तिच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पूजा सोशल मीडियावर फार सक्रिय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यामुळे इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना साखरपुड्याची गोड बातमी दिली. मात्र तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दिसत नव्हता. आता मात्र तिने तिच्या नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

मराठी अभिनेत्री पूजा सावंतने २८ नोव्हेंबर २०२३ रोजी होणाऱ्या नवऱ्यासोबतचे काही खास फोटो शेअर करत बोटातील अंगठी फ्लॉन्ट करत साखरपुडा झाल्याची घोषणा केली. ‘माझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायासाठी मी सज्ज झाले आहे. ही प्रेमाची जादू असून आम्ही आमचा सुंदर प्रवास सुरु करत आहोत. We are engaged…’, असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले होते. मात्र या फोटोंमध्ये तिने नवऱ्याचा चेहरा दाखवला नव्हता. पण तिचे चाहते तो भाग्यवान कोण आहे..? याबाबत सतत विचारणा करत होते.

अखेर पूजाने सर्वांची उत्सुकता न ताणता तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवला आहे. ‘मी एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी प्रचंड उत्साही आहे. लव्ह यू सिड्डी..’, असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत. पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव सिद्धेश चव्हाण असे आहे.

माहितीनुसार, तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. अखेर पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा आणि ओळख समोर आली आहे. पूजाने शेअर केलेल्या फोटोंवर अनेक चाहते, नेटकरी आणि कलाकार मंडळी कमेंट करत आहेत. यामध्ये गौरी नलावडे, मानसी नाईक, सचित पाटील, पुष्कर जोग, नंदिता पाटकर, गश्मीर महाजनी आणि अजून अनेकांचा समावेश आहे.