हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, रिऍलिटी शो आणि चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे अभिनेते किरण माने फार लोकप्रिय आहेत. त्यांच्या अभिनयाइतकेच त्यांच्या लेखणीचेदेखील बरेच चाहते आहेत. अनेकदा ते व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयावर पोस्ट शेअर करतात आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतात. सध्या त्यांनी शेअर केलेली एक व्हिडीओ पोस्ट फार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे.
ज्यामध्ये किरण माने बोलताना दिसत आहेत कि, ‘परवा एकजण म्हटला कि.. देश विकला गेलाय.. सगळं विकलं गेलंय.. काय राहिलंय..? म्हटलं, न्हाय.. किरण माने कुठं विकला गेलाय..? न्हाय न्हाय.. तुम्ही सगळे कुठं विकला गेलाय..? छे!! छे!! कुणी विकलं गेलेलं न्हाय.. आपण हाय.. लढायला समर्थ हाय.. ताकद हाय आपल्यात.. जीवात जीव हाय तोवर लढत राहुयात आणि संविधानाचं रक्षण करूयात.. जय शिवराय!! जय भीम!!’ किरण मानेंच्या या भाषणावर कडकडून टाळ्या वाजल्या.
इतकंच काय तर, या भाषणाच्या व्हिडीओशेवटी ‘मुझको पहचान लो.. मैं हू डॉन’ हे गाणं लावण्यात आलं आहे. किरण माने यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलेलं कॅप्शनदेखील फार चर्चेत आलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे कि, ‘बिकने वाले और भी है, जाओ जाकर खरीद लो… हम कीमत से नहीं, किस्मत से मिला करते है!!!’ किरण मानेंची हि पोस्ट व्हायरल झाली असून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलंय, ‘जो दिल जीतते है, उनको खरीदना मुश्किल ही नही ना मुमकीन है। एक नंबर बोललात दादा..’. तर आणखी एकाने लिहिलं, ‘ठिणगीचा वणवा नक्की होणार..!!’