‘बाईपण भारी देवा’मधील शशी साकारणाऱ्या वंदना गुप्तेंना अटक; फोटो झाला व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला असून तुफान गाजतोय. या चित्रपटात ६ सामान्य बहिणींची असामान्य गोष्ट दाखवली आहे. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी- मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीप परब- चौधरी या सहा गुणी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसत आहेत. प्रत्येकीने आपल्या अभिनयाचा पूर्ण कस लावून कथानकाला न्याय दिला आहे. त्यामुळे या चित्रपटाला महिला वर्गाचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान चित्रपटात शशी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अटक झाल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात ठरवलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण करणारी आणि नेहमी पहिला नंबर पटकावणारी ‘शशी’च्या भूमिकेत अभिनेत्री वंदना गुप्ते दिसत आहे. या चित्रपटाला महिला वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या शोपासून हा चित्रपट चांगलाच हिट होताना दिसतोय. प्रत्येक शोला महिलांची विशेष गर्दी होताना दिसतेय आणि म्हणून शशीला म्हणजेच अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अटक करण्यात आल्याचा एक मजेशीर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटो वंदना गुप्ते याना पोलिसांच्या गाडीत नेलं जातंय.

हा फोटो केदार शिंदे यांनी शेअर केला असून त्याच्यासोबत कॅप्शनमध्ये लिहलंय, ‘हे SOLID आहे’. या चित्रपटात वंदना गुप्ते साकारत असलेली शशी हि बँकेत जॉब केल्यानंतर रिटायर झाली आहे. पण ती अत्यंत धडपडी आणि सतत काहीतरी हाताला काम हवं अशी स्त्री आहे. त्यामुळे ती स्वस्थ बसत नाहीये असं काहीसं उत्साही पात्र आहे. हि भूमिका वंदना गुप्ते यांनी अत्यंत एन्जॉय केल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट महिलांना जगण्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देत आहे. केवळ महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही या चित्रपटातून अत्यंत महत्वाचा बोध दिला जात आहे. त्यामुळे केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांनी देखील हा चित्रपट पहावा असे सांगितले जात आहे.