Priya Berde | ‘त्यांनी मला राजकारणात येऊच दिलं नसतं…’ प्रिया बेर्डे यांनी मांडले राजकारणाबाबत लक्ष्मीकांत यांचे मत


Priya Berde | मराठी चित्रपट सृष्टीतील असे अनेक कलाकार आहे जे सध्या राजकारणात देखील सक्रिय आहे. आणि त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे. प्रिया बेर्डे यांनी एक काळ मराठी सिनेसृष्टी खूप गाजवलेली आहे. अनेक विविध भूमिका करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. नुकतेच प्रिया बेर्डे यांनी माध्यमांना मुलाखत दिली. आणि या मुलाखतीत त्यांनी राजकारणात येण्याबाबत भाष्य केलं. प्रिया बेर्डे या सध्या राजकारणात सक्रिय आहेत राष्ट्रवादी पक्षाला सोडल्यानंतर त्यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे असते तर आत्ता त्यांनी तुमच्या राजकारणात येण्याच्या प्रवेशाविषयी काय वाटले असते. असे विचारले यावर त्या म्हणाल्या की, “लक्ष्मीकांत आज असते तर त्यांनी मला राजकारणात येऊन दिलं नसतं. ते म्हणाले असते तू तुझा संसार सांभाळ या भानगडीत तू पडू नकोस. कारण तुझा तसा स्वभाव नाही इतका फटकळ स्वभाव सरळ तोंडावर बोलणारी बाई राजकारणात कशी असू शकते.”

हेही वाचा – ‘मी खरंच नि:शब्द झाले..’; बॉलिवूडच्या ड्रिमगर्लला भेटल्यानंतर रुपालीने व्यक्त केला आनंद

पुढे त्या म्हणाल्या की, “पण माझं म्हणणं आहे की, मी राजकारण म्हणून काम करत नाही. तर मी सांस्कृतिक विभागात काम करते. मी कलाकारांसाठी काम करते ते माझं अगदी सरळ आहे.” त्यांची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांना दोन मुले आहेत. मुलीचे नाव स्वानंदी तर मुलाचे नाव अभिनय आहे. अभिनय देखील मराठी चित्रपटसृष्टी मध्ये काम करायला सुरुवात केली आहे. तसेच स्वानंदिनी रंगभूमीवर सध्या पदार्पण केले आहे.