हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी सीजन ४’चा विजेता अक्षय केळकरने अलीकडेच कळव्याचं घर सोडलं. यानंतर तो कुठे गेला..? याबाबत बरीच चर्चा रंगली. तर आता अक्षयने स्वतःच त्याच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का देत आपण मुंबईत स्वतःच घर घेतल्याची माहिती दिली आहे. म्हाडाच्या लॉटरीमधून अक्षयला हे घर मिळालं आणि त्याच हक्काचं झालं. याबाबत त्याने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. सोबत नव्या घराचं झलकदेखील पहायला मिळतेय.
हा व्हिडीओ शेअर करत अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘माझं पहिलं घर – ते ही मुंबईत !!!! २०२३ मध्ये सगळ्या सुंदर गोष्टी आयुष्यात घडल्या, त्यातली खूप सुंदर आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुंबईत माझं स्वतःच “घर”!!! काही वर्षांपूर्वी जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या ५ मित्रांसोबत, म्हाडाच्या बिल्डिंग मध्ये रूम शेअर करून भाड्याने राहत होतो. त्याच म्हाडाच्या मुंबईच्या प्रकल्पामध्ये या वर्षी अर्ज केला होता आणि सोडतीमध्ये विजेता ठरलो!!! स्वप्नवत आहे पण, मला हवा तसा view मिळाला आहे. ज्यातून मी रोज चमकणाऱ्या, धावणाऱ्या मुंबईला बघू शकतो’.
पुढे लिहिलंय, ‘सगळी जमवाजमव, कागदपत्र, loan, तयारी आणि खूप मोठी, किचकट पण हवीहवीशी procedure… म्हाडाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद!! ही सगळी procedure पार पाडताना तुमची खूप मदत मिळाली आणि तुमच्यातला positive approach खरोखर कौतुकास्पद आहे. तुमच्या साथीमुळे घराचा आनंद द्विगुणित झाला. तर, आज माझ्या घराची चावी हातात आली!!! या वर्षाची सुरुवात आणि शेवट दोन्ही “विजेता” अशी होते आहे, ही मालिका या पुढे अशीच सदैव सुरू राहू दे. तर अश्या प्रकारे, मुंबईत स्वतःच घर झालं! Extremely happy to share that, I Bought my first house in Mumbai’. अक्षयच्या या पोस्टवर त्याचे चाहते, कुटुंबीय आणि अनेक कलाकार मंडळी कमेंटच्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.