हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीच्या ‘तुझ्या जीव रंगला’ या कार्यक्रमामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अक्षया देवधर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. या मालिकेतील राणा दा हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता हार्दिक जोशीसोबत लग्न केल्यापासून अक्षया वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येऊ लागली आहे. नुकतीच अक्षयाने तिच्या बाबांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
अभिनेत्री अक्षया देवधर हि सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे केवळ कामाबाबत नव्हे तर खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींविषयी ती या माध्यमातून चाहत्यांना माहिती देत असते. नुकतीच तिने आपल्या बाबांसाठी म्हणजेच महेश देवधर यांच्यासाठी एक इंस्टा स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अक्षया देवधरचे बाबा गेली अनेक वर्ष भारतीय रेल्वेत काम करत होते. गुरुवारी ३० नोव्हेंबर २०२३ रोजी ते सेवानिवृत्त झाले आणि यानिमित्त अक्षयाने हि स्टोरी पोस्ट केली आहे.
वडिलांच्या सेवानिवृत्ती समारंभातील काही फोटो तिने इंस्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने लिहिलंय, ‘Happy Retirement बाबा!!! तुम्ही भारतीय रेल्वेत जवळपास ४० वर्ष काम केलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला तुमचा कायम अभिमान आहे. आता वर्ल्ड टूर!’ सेवानिवृत्तीदरम्यान अक्षयाच्या वडिलांना त्यांची नोकरी व भारतीय रेल्वेची आठवण कायम लक्षात राहावी म्हणून छोटं इंजिन भेटवस्तू देण्यात आलं आहे. याचादेखील फोटो तिने शेअर केला आहे.