Rinku Rajguru | सैराट या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणारी रिंकू राजगुरूंनी फार कमी वयात लोकप्रिय तिच्या शिखर गाठले आहे. आज रिंकूचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात. एवढेच काय पण अगदी अनेक चाहत्यांची लग्न करायची देखील इच्छा असल्याचे पाहायला मिळते. परंतु आता लग्न सोडा पण एका तरुणाने थेट रिंकू त्याची बायको असल्याचा दावा केला. इतकंच नाही तर रिंकूला भेटण्यासाठी तो तिचा पाठलाग करू लागला होता. माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत रिंकूने या गोष्टीचा खुलासा केला आहे.
नुकताच रिंकू राजगुरू हिचा झिम्मा 2 हा चित्रपट रिलीज झालेला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मुलाखत देताना माय फर्स्टमध्ये तिला काही प्रश्न विचारण्यात आले यावेळी तिने असाच एक अनुभव सांगितला
काय म्हणाली रिंकू | Rinku Rajguru
या सिग्मेंटमध्ये तिला तुला कुठल्या विचित्र चाहत्यांचा काही अनुभव आलाय का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी रिंकूने घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. एका चाहत्याला तिच्याशी लग्न करण्यासाठी तिचा पाठलाग करत होता. इतकाच नाही तर तिच्या घरापर्यंत देखील पोहोचला होता.
यावेळी रिंकूने सांगितले की, “एक माणूस होता जो सातत्याने माझ्या घरी येत होता. आणि फक्त घरी येत नव्हता तर तो सांगायचा की, ही माझ्या मागच्या जन्मातली बायको आहे. तो सतत मला रुक्मिणी वगैरे अशा नावाने हाक मारायचा त्यावेळी मी सतरा अठरा वर्षाची असेल.’
हेही वाचा – वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर पाठकबाईंची खास पोस्ट; म्हणाली, ‘भारतीय रेल्वेत 40 वर्ष..’
पुढे ती म्हणाली की, “मी एका कार्यक्रमात गेले होते त्यावेळी सगळ्यांना पाहून मी हाय हॅलो केलं. तर त्याचं म्हणणं होतं की, मी त्याच्याकडे पाहून हाय केलं. आणि मी त्याच्या डोळ्यात पाहत होते. पण मला हे काहीच आठवत नाही. त्यानंतर मी ज्या इव्हेंटला जायचे तिकडे तो माणूस यायचा. घरी यायचा आणि म्हणायचा की देवीचा अवतार आहे. तुझ्यात रुक्मिणी मला दिसते. मागच्या जन्मात ही माझी बायको होती. मग या जन्मात मला तिच्याशी लग्न करायचे तो सतत त्रास द्यायचा आहे खूप भीतीदायक होतं.”
रिंकू राजगुरु हिने झिम्मा 2 मध्ये साकारलेली भूमिका फारच विनोदी आहे. तिच्या या पात्राने सिनेमांमध्ये रंगत आली आहे. आणि त्यांना तिचे पात्र खूप आवडले आहे.