हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना लोटपोट करून हसवणारा अभिनेता कुशल बद्रिके हा कायम चर्चेत असतो. केवळ अभिनयामुळे नव्हे तर तो सोशल मीडियावर शेअर करत पोस्टमुळे देखील चर्चेत येताना दिसतो. गेल्या काही काळात कुशलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या बऱ्याच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. अशातच आता त्याने आणखी एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हि पोस्ट सत्य घटनेवर आधारित असल्याचे त्याने यात म्हटले आहे.
कुशलने हि पोस्ट शेअर करताना लिहिलं, ‘ही post सत्य घटनेवर आधारित आहे. माझ्या लग्नाला तसा माझ्या सासर कडून, कडकडून विरोध होता, मला कायम असं वाटत राहील की माझं दिसणं हेच त्याला कारणीभूत असेल. आता हे photos हाती लागेपर्यंत मी ह्याच “गैर समजुतीत” होतो. हे photos मला मिळाले त्या क्षणी मी सुनयना कडे तडक गेलो आणि फोटो दाखवून तिला म्हणालो “ह्या मुलाला तुम्ही नाकारल होतं, ह्या अश्या दिसणाऱ्या मुलाला नाकारण्याची तुमची हिंमत झालीच कशी..?” सुनयना मला शांतपणे म्हणाली की “तू अजूनही तसाच दिसतोस, हल्ली कॅमेरे बऱ्या क्वालिटीचे आलेत”. मग मी आरशात एकदा स्वतःला पाहिलं आणि माझा “गैरसमज” संपूर्ण दूर झाला! खरच… technology काय develop झाली आहे यार, कॅमेरे चांगले आलेत market मधे. (सुकून) संजय मांडरे तुझाकडचा camera भारी आहे’.
कुशलच्या या पोस्टवर अनेकांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एकां नेटकऱ्याने म्हटलंय, ‘तू कसा दिसतो यापेक्षा तुझं मन कसं दिसते हे महत्वाचे.. जे मनात असतं ते चेहऱ्यावर दिसतं. बाकी लेंन्स आणि कॅमेऱ्यामुळे फोटोत हिरो सारखा दिसतोस हे बाकी खरं!!’ तर आणखी एकाने लिहिलं, ‘कोणती ही व्यक्ती रेखा, काम सुंदरपणे तुम्ही साकारता, लोकांना खळखळून हसवता, त्यामुळे दिसण्याचे काही नाही सर, तुमचे काम बोलते की तुम्ही मनातून branded माणूस आहात, शुद्ध, निखळ आहात’. अशाप्रकारे कुशलचे चाहते त्याच्या दिसण्यावर नव्हे तर त्याच्या कामावर प्रेम करत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.