‘अखेरच्या श्वासापर्यंत…’; वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करणाऱ्या चाहत्यांचे प्रेम पाहून भारावला पृथ्वीक प्रताप


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने छोट्या पडद्यावरून अनेक गुणी कलाकार सिनेसृष्टीला दिले आहेत. यांपैकी एक अभिनेता पृथ्वीक प्रतापने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या हटके अंदाजाने त्याने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. नुकताच ३० नोव्हेंबर रोजी त्याचा वाढदिवस झाला आणि यानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

हा व्हिडीओ अभिनेता पृथ्वीक प्रताप याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. पृथ्वीकच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केल्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हार्याल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चाहत्यांच्या गर्दीत काहींनी पृथ्वीकचा फोटो तर काहीजण व्हिडीओ काढताना दिसत आहेत. तर काही चाहते त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला पृथ्वीकने त्याच्या फेव्हरेट सुपरस्टार शाहरुख खानचे ‘चांद तारे’ हे गाणे जोडले आहे.

पृथ्वीकने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘वाढदिवसानिमित्त तुम्ही साऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छा घेऊन नव्या वर्षात पदार्पण करतोय. हे प्रेम असाच राहू द्या मायबाप. अखेरच्या श्वासापर्यंत तुमच मनोरंजन करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करत राहीन’. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल झाला आहे. यावर पृथ्वीकच्या चाहत्यांनी, सहकलाकार मंडळींनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पृथ्वीक प्रतापच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरच ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात पृथ्वीकसोबत अभिनेता प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे.