‘माझ्यासाठी रखुमाई हो.. मला काम दे’; ज्येष्ठ कलावंताचे रील स्टार कोकण हार्टेड गर्लकडे आर्जव


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर कोकण हार्टेड गर्ल या नावाने प्रसिद्ध असणारी अंकीता वालावलकर गेल्या काही महिन्यांपासून फारच चर्चेत आहे. अंकिता रील स्टार असल्यामुळे तिची सोशल मिडीयावर कायम चर्चा असते. अंकीताचे व्हिडीओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात. अंकिता केवळ रील स्टार म्हणून नव्हे तर सामाजिक भान जपण्यासाठी देखील चर्चेत असते. नुकताच तिने ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांच्यासोबतच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यांनी तिच्याकडे काम मागितलं आहे.

अंकीताने जो व्हिडीओ शेअर केलाय त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर दिसत आहेत. मनमोहन या व्हिडिओत अंकीताकडे काम मागत आहेत. मनमोहन यांचे लग्न झालेले नाही त्यामुळे त्यांचा संसार वा कुटुंब नाही. ते एकटेच राहतात. सध्या त्यांच्या हाताला कामदेखील नाही आणि म्हणून त्यांनी ईच्छा मरणाची गोष्ट अंकीतासमोर बोलुन दाखवली आहे. त्यांच्या कहाणीने अंकीताचं मन भरून आलं आहे आणि तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिलंय, ‘माझ्यासाठी रखुमाई बनून उभी रहा मुली. मला काम हवंय!! ही वाक्य मला झोपू देणार नाहीत. सो मी ही रील बनवण्याचा निर्णय घेतला’.

‘वास्तव हे आहे की टीव्ही असो की बॉलीवूड ही इंडस्ट्री रिलेशनशिप बिझनेस आहे. आपण प्रतिभावान असणे आणि आपली काम बंद करणे ही किमान गोष्ट आहे. आपल्याला भूमिकांसाठी शिफारस करतील असे नातेसंबंध विकसित आणि टिकवून ठेवावे लागतील. सर्व नाती जोपासण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जेव्हा तुम्ही कलाकार पार्टीसाठी बाहेर जातात आणि चांगली वेशभूषा करताना पाहतात तेव्हा तुम्हाला खरे काम मिळते. पार्टीला जाणे हे महत्वाचे काम असते. सारांश… प्रत्येक कामासाठी बरेच कलाकार असतात. प्रतिभा अप्रासंगिक आहे. मेहनत दिली आहे. नात्याची दारे उघडतात. नातेसंबंध संधी देतात. नातेसंबंध म्हणजे सर्वकाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी चूक असल्यास मला दुरुस्त करा’.