‘बिग बॉसच्या घरात जुळलेलं प्रेम…’; अमृता- प्रसादच्या नात्यावर ‘या’ मराठी अभिनेत्रीची पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख हे बिग बॉस मराठीच्या घरात प्रेमात पडले आणि घराबाहेर पडल्यानंतर लग्नबंधनात अडकले. त्यामुळे हि जोडी प्रचंड चर्चेत राहिली. अलीकडेच १८ नोव्हेंबर २०२३ रोजी अमृता आणि प्रसाद एकमेकांसोबत लग्न बंधनात अडकले.

त्यांच्या लग्नाच्या प्रत्येक विधीचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत राहिले. त्यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंब, जवळचे मित्र मैत्रिणी आणि काही कलाकार मंडळी उपस्थित होती. दरम्यान बिग बॉस फेम आणि मराठी कलाविश्वात प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची त्यांनी या नवं दांपत्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

प्रसाद आणि अमृता हे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही एकत्र राहिले आणि त्यांनी आपली लव्ह स्टोरी पूर्णत्वास नेली. याचे अनेकांनी कौतुक केले. दरम्यान हे जोडपं सुरेखा कुडची यांना प्रवासादरम्यान एका थांब्यावर भेटलं. मग काय भेट झाली. शुभेच्छा दिल्या आणि प्रेमाचा वर्षाव करत सुरेखा यांनी एक पोस्ट शेअर केली. पुणे- मुंबई प्रवास करताना मधल्या फूड स्टॉलवर सुरेख कुडची यांना प्रसाद- अमृता भेटले. दरम्यानचा फोटो शेअर करत सुरेखा यांनी त्यांच्या नात्याचं मोजक्या शब्दात वर्णन करणारी पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी हि पोस्ट शेअर करताना लिहिलंय, ‘कोण कधी कुठे भेटेल काही सांगता येत नाही… पुणे – मुंबई प्रवास करताना फूड मॉलला थांबलो अचानक समोर नवीन लग्न झालेलं जोडपं आलं… अहो आपली सगळ्यांची लाडकी जोडी म्हणजेच अमृता आणि प्रसाद… लग्नाच्या शुभेच्छा ही दिल्या आणि फोटो तो बनता है बॉस… बिग बॉसच्या घरात जुळलेलं प्रेम बाहेर येईपर्यंत संपलेलं असतं असंच आपण आतापर्यंत पाहिलंय पण, हे दोघेही अपवाद!!! खूप मनापासून आनंद झाला… त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!’