Prashant Damale | ‘माझी पत्नी केवळ 850 रुपयांत घर चालवायची…’ प्रशांत दामले यांनी सांगितल्या कठीण काळातील आठवणी


Prashant Damale | मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांनी नाटक मालिका तसेच चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटविला आहे. प्रशांत दामले हे एक अभिनेते असल्यासोबत एक उत्तम गायक देखील आहे. आणि यासोबत ते निर्माते देखील आहेत. नुकतेच त्यांनी माध्यमांना मुलाखत दिली. आणि या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरसोबत त्यांच्या आयुष्यातील खरतर प्रवास देखील शेअर केला आहे.

गेले 40 वर्षापासून ते मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. परंतु हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता यामध्ये त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहेत. याबद्दल त्यांनी खुलासा केला आहे.

हेही वाचा – ‘बिग बॉसच्या घरात जुळलेलं प्रेम…’; अमृता- प्रसादच्या नात्यावर ‘या’ मराठी अभिनेत्रीची पोस्ट

त्यांच्या कठीण काळाबद्दल सांगताना ते म्हणाले की, “27 डिसेंबर 1985 मध्ये माझे लग्न झाले. 1986 मध्ये मी माझे पहिले नाटक ब्रह्मचारी केले. एकतर माझी पत्नी गौरीचा माझ्यावर असलेल्या विश्वास खूप महत्त्वाचा होता. 1987 साली मला पहिली मुलगी झाली आणि 1992 ला दुसरी मुलगी झाली.”

काय म्हणाले प्रशांत दामले | Prashant Damale

पुढे ते म्हणाले की, “मला आठवते की साधारणपणे गौरी 850 रुपयांमध्ये घर चालवायची आणि कुठेही काही कमी नसायचे, तक्रार नसायची. मला पहिली नाईट 25 रुपये मिळाली होती. त्यानंतर 75 रुपये झाली. विश्वास आणि व्यवस्थापन यामुळेच हे सगळे शक्य झाले. 1992 ला जेव्हा गेला माधव कुणीकडे या नाटकाला पहिला हाऊसफुलचा बोर्ड लागला. तेव्हा मी गौरीची बोललो की, आता बेस्टमध्ये आपली जागा फार काळ अडकून ठेवण्यात काही अर्थ नाही. माझ्या जागी तिथे दुसरा कोणाला तरी नोकरी लागू शकते. आणि या नाटकावर आपण पुढे जाऊ शकतो तेव्हा तिने मला पाठिंबा दिला त्यानंतर मी नोकरी सोडून फक्त नाटकावर लक्ष केंद्रित केले.”

पुढे ते म्हणाले की, “त्यावेळी मीच फक्त नाटकात काम करत होतो. अभिनय करत होतो मात्र घर सांभाळणे ही खूप कठीण गोष्ट आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत घरातील स्त्री असंख्य काम करत असते. वेळेचं नियोजन ही स्त्रियांकडे उपजत असतं. त्यात तर डोंबिवली ते मुंबई प्रवास करत नोकरी करणारी स्त्री असेल तर मला तिचे पाय धरावेसे वाटतात. इतकी वर्ष माझ्या स्क्रीन प्रमाणे माझ्या पत्नीने तिच्या आयुष्य केले तिने कोणत्याही समस्या माझ्यापर्यंत येऊ दिल्या नाही.”

या मुलाखतीमध्ये त्यांचे खडतर आयुष्य तसेच त्यांच्या पत्नीने त्यांना दिलेला आधार आणि ऍडजेस्टमेंट याबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी सांगितलेली आहे.