‘दादा एक गुडन्यूज आहे’ नाटकाने पार केला 350 प्रयोगांचा टप्पा; प्रिया बापटने शेअर केली खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचा पती अभिनेता उमेश कामत हे मराठी कलाविश्वात अत्यंत लोकप्रिय कपल आहे. दोघांचा वैयक्तिक आणि एकत्र असा मोठा चाहता वर्ग आहे. नाटक, मालिका, चित्रपट आणि सीरिजमधून काम करत दोघांनीही प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. दरम्यान, प्रिया बापट आणि उमेश कामत यांचं ‘दादा एक गुडन्यूज आहे’ हे नाटक गेला काही महिन्यांपासून चर्चेत आहे. नाटकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली असून आता लवकरच या नाटकाचा ३५० वा प्रयोग झाला. यानिमित्त प्रियाने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री आणि निर्माती प्रिया बापटने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये या नाटकातील कलाकार, लेखक आणि तंत्रज्ञ मंडळी दिसत आहेत. या फोटोंसोबत प्रिया बापटने लिहिलेल्या कॅप्शनमध्ये कलाकारांचे आभार मानले आहेत. तिने म्हटलंय, ‘आज “दादा एक गुडन्यूज आहे” या नाटकाचा ३५० वा प्रयोग आहे. Formality नाही पण खरचं नाटक बसवतानाच्या अडचणींपासून ते कोव्हिड, मग खूप houseful चे बोर्ड, नवीन कलाकारांची entry, नवीन नाटकामुळे याच्या प्रयोगात पडलेला खंड, या सगळ्यातून बाहेर पडून हे नाटक ३५० चा टप्पा गाठतय’.

पुढे लिहिलंय, ‘कल्याणीचं पहिलं नाटकं, नंदू सरांबरोबर आमची पहिली निर्मिती, अद्वैत आणि सर्व टिमचं या नाटकावरच प्रेम हे सगळचं खूप special आहे. त्यासाठी सर्वांना खूप प्रेम आणि खूप Thank you! ही टिम खूप Special आहे आणि हे नाटकही कायम Most special राहील’. दरम्यान ‘दादा एक गुडन्यूज आहे या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, आरती मोरे, ऋषी मनोहर अशी तगडी स्टारकास्ट आहे. तसेच या नाटकाच्या माध्यमातून प्रिया बापटने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. सोनल प्रॉडक्शन निर्मित, अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकाचे लिखाण कल्याणी पाठारे यांनी केले आहे.