‘एक नवी स्वप्नवत सुरुवात…’; पतीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत हृताने दिली आनंदाची बातमी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे ही ‘फुलपाखरु’ या मालिकेमुळे प्रकाशझोतात आली. या मालिकेने हृताला एक ओळख दिली. यानंतर हृता प्रेक्षकांच्या मनात अशी वसली कि तिला ‘महाराष्ट्राची क्रश’ म्हणून ओळखले जाऊ लागले. पण अनेक चाहत्यांच्या दिलाचे तुकडे करत हृताने तिच्या बॉयफ्रेंडसोबत म्हणजेच प्रतीक शहासोबत लग्न केलं. यानंतरही तिचा चाहता वर्ग कमी झालेला नाही. दरम्यान, नुकतीच हृताने नवऱ्यासोबतचा खास फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे.

हृता दुर्गुळे हि सोशल मीडियाववर फार सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे हृता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रोफेशनल ते पर्सनल गोष्टी शेअर करताना दिसते. आताही तिने याच माध्यमातून आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा क्षण शेअर केला आहे. नुकतीच अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक रोमँटिक फोटो शेअर करत हृताने आपल्या चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. तर हृता आणि तिचा नवरा प्रतीक यांनी नुकतंच स्वतःचं हक्काचं घर खरेदी केलं आहे.

अभिनेत्री हृता दुर्गुळेने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आणि तिचा पती प्रतीक शाह दिसत आहे. या रोमँटिक फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘एक नवी स्वप्नवत सुरुवात. प्रेम आणि स्वप्न. नवीन घर, खास दिवस’. या फोटोत हृता आणि प्रतीक यांच्या चेहऱ्यावर नवीन आनंद झळकतो आहे. हृताच्या या पोस्टवर नेटकरी, चाहते आणि अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत त्यांना नव्या घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.