BIGG BOSS मराठी फेम सई लोकूरने घेतलं बंगळुरुमध्ये नवं घर; गृहप्रवेशाचा व्हिडीओ व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक चर्चा ओढून घेणारा रिऍलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी. या कार्यक्रमाचे आतापर्यंत ४ सीजन झाले आहेत आणि चारही हिट ठरले आहेत. यातील पहिल्या सिजनमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सई लोकूर हि सोशल मीडियावर फार सक्रिय असते. मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वात तिने काम केले आहे. सोशल मीडियावर विविध फोटो, व्हिडीओ शेअर करणाऱ्या सईने नुकताच नव्या घराची झलक दाखवणारा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

अभिनेत्री सई लोकूर आणि तिचा पती तीर्थदीप रॉय यांनी नुकतच बंगळुरूमध्ये नवं घर खरेदी केलं आहे. अभिनेत्री सई लोकूरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सई लोकूर आणि तिचा पती तिर्थदीप रॉय हे एकत्र त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश करताना दिसत आहेत. सईने शेअर केलेल्या व्हिडिओत दिसत आहे कि त्यांच्या नव्या घराची पूजा आणि होम- हवन सुरु आहे. यावेळी सई आणि तिर्थदीप रॉय यांच्या चेहऱ्यावर झळकणार आनंद अत्यंत स्पष्ट दिसत आहे.

सई आणि तिर्थदीप या दांपत्याने बंगळुरुमध्ये नवीन घर खरेदी केले असून या घराची झलक अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. तिने तिच्या या नव्या भव्य घराची झलक शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘नवीन सुरुवात, मला माझ्या पतीचा खूप अभिमान वाटतो’. सईच्या या व्हिडीओवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिला नव्या घरासाठी अभिनंदन म्हटले आहे. सई लोकूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तिने आतापर्यंत काही मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ या चित्रपटांमध्ये आणि बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिजनमध्ये ती दिसली होती.