‘सुंदरा..’ फेम अभिनेत्याचे अशोक सराफांकडून कौतुक; म्हणाला, ‘हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता समीर परांजपे सध्या ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ या नव्या पर्वातून आपल्या भेटीस आला आहे. मालिका संपल्यानंतर आता समीर आपल्या श्रवणीय आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकतोय. नुकतेच या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ पाहुणे म्हणून हजर राहिले होते. यावेळी त्यांनी समीरच्या अभिनयाचे आणि आवाजाचे कौतुक केले. हा अनुभव आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हणत समीरने हि पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आजचा एपिसोड आजचं गाणं माझ्या आयुष्यातला तो क्षण आहे जो आयुष्यभर कायम आत्तरासारखा मनात दरवळत राहील आणि मला कायम विचारत राहील, गाणं करतोयस ना? शूटींग सुरू झालं अशोक मामांची आणि निवेदिता ताईंची एन्ट्री झाली आणि मला बघून अशोक मामा म्हणाले अरे तू गातोस? मला वाटलं छान अभिनयच करतोस फक्त.. मी पाहिलंय तुझं काम.. छान करतोस काम.. ते मला ओळखतात त्यांनी माझं काम पाहिलंय हा माझ्यासाठी अभिनेता म्हणून अभिमानाचा क्षण होता’.

‘हो अभिमानच.. गर्व म्हणा हवं तर.. आणि का नसावा..? रविवारी दुपारी ४ वाजता दूरदर्शन वर लागणाऱ्या ह्यांच्या फिल्म्स बघत मोठे झालो आणि आज पहिल्यांदा ते भेटतात आणि हे बोलतात अजून काय हवं एखाद्या नवीन अभिनेत्याला.. या एपिसोडला गाणं ही ते मिळावं जे मला माझ्या गुरुंनी जवळपास २० वर्षांपूर्वी शिकवलं होतं.. प्रोमो बघून नीलूताईंचा आशीर्वादरुपी मेसेज यावा.. कृतज्ञता, रितेपण आणि वनवास संपल्याचा आनंद हे सगळं जगलोय मी.. एपिसोड बघा आणि एक आशीर्वाद नक्की द्या “जीते रहो गाते रहो” ‘. समीरच्या या पोस्टवर त्याचे चाहते कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.