अ सिंड्रेला स्टोरी!!! सई लोकुरचं पिंक- ब्ल्यू थीमसोबत क्युट मॅटर्निटी फोटोशूट; पहा फोटो


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस’ मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सईने हि आनंदाची बातमी दिली होती. यानंतर तिने आईपण अनुभवतानाचा प्रत्येक क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केल्याचे आपण पाहिले. सईच्या गर्भारपणात तिचा पती तीर्थदीप तिची काळजी घेताना दिसत आहेत. सई आणि तीर्थदीप त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनासाठी फार उत्सुक आहेत. अलीकडेच त्यांनी या सुंदर क्षणांना कायम सोबत ठेवता यावे म्हणून क्युट मॅटर्निटी फोटोशूट केले. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या खास मॅटर्निटी फोटोशूटसाठी अभिनेत्री सई लोकुरने गुलाबी आणि निळ्या रंगाचा लॉन्ग गाऊन परिधान केला आहे. तर सईचा पती तीर्थदीप रॉयने निळ्या रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला आहे. या खास फोटोंसाठी गुलाबी आणि निळ्या रंगाची थीम वापरण्यात अली आहे. हातात गुलाबी- निळे फुगे घेऊन सई आणि तीर्थदीपने फोटोंसाठी पोज दिल्या आहेत. सईने या खास मॅटर्निटी फोटोशूटला ‘A Cinderella Story!’ असे गोड कॅप्शन दिले आहे. सध्या सईचं हे मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री सई लोकूर तिच्या गर्भारपणाचा काळ मनापासून एन्जॉय करताना दिसत आहे. सई आणि तीर्थदीप यांनी २०२० साली लग्न केले आणि आता ते आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यास उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी सईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला होता. त्याचेही फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. जे प्रचंड व्हायरल झाले होते. सई आणि तीर्थदीप त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी फार उत्सुक आहेत आणि त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकतो आहे.