गुलाबी शरारा!! रुपाली भोसलेचा भावासोबत ट्रेंडिंग गाण्यावर किलर डान्स; म्हणाली, ‘स्टेप्स सारख्या नसतील पण..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजना हे पात्र साकारणारी मराठी अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर फार सक्रिय असते. वेगवेगळ्या कारणांमुळे तिची कायम चर्चा होत असते. उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःसाठी जागा निर्माण केली आहे. शिवाय ती सोशल मीडियावर वेगवेगळे लूक आणि रिल्स शेअर करून कायम सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. आताही तिने एक खास रील शेअर केली आहे. ज्यात ती स्वतःच्या भावासोबत ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करताना दिसतेय.

अभिनेत्री रुपाली भोसले अनेकदा ट्रेंडिंग गाण्यावर रील्स बनवून सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. पण हि रील तिच्यासाठी खास आहे. कारण या रिलमध्ये तिच्यासोबत तिचा भाऊ संकेत भोसले आहे. रुपालीने तिच्या भावाबरोबर ‘गुलाबी शरारा…’ या इंस्टाग्रामवर ट्रेंडिगमध्ये असणाऱ्या गाण्यावर डान्स केला आहे. यामध्ये रुपालीने गुलाबी रंगाची साडी नसल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसतेय. रुपालीच्या भावाने यापूर्वी कधीच रील व्हिडीओ बनवला नव्हता आणि त्यामुळे भावासोबत पहिल्यांदाच रील करताना तीला प्रचंड आनंद झाल्याचे तिने म्हटले आहे.

अभिनेत्री रुपाली भोसलेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय कि, ‘संकेत माझा भाऊ माझ्यासोबत त्याच्या पहिल्या रीलमध्ये पदार्पण करत आहे. यासाठी त्याची मनधरणी करणे हे मोठे काम होते. पण रील करायची होती आणि ती सुद्धा आजचं. म्हणून बर्गर पार्टीचं आमिष दिलं आणि रीलसाठी त्याचा होकार घेतला. आम्ही दोघांनी केलेल्या स्टेप्स कदाचित सारख्या नसतील पण, हा व्हिडीओ शूट करताना मी प्रचंड आनंदी होते’. दरम्यान, रुपालीने शेअर केलेल्या या भावा- बहिणीच्या गोड व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.