स्पेशल अंगठ्यांसोबत सुरु झाला सागर- मुक्ताच्या आयुष्याचा नवा अध्याय; साखरपुडा विशेष भागाचा प्रोमो व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. मालिकेचे कथानक, कलाकारांचा अभिनय आणि मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. लवकरच या मालिकेत सतत भांडणाऱ्या कोळी आणि गोखले कुटुंबात शुभकार्य पार पडणार आहे. ज्याची सुरुवात झाली असून मुक्ता- सागरचा साखरपुडा पार पडला आहे. यावेळी दोघांनी एकमेकांना स्पेशल अंगठी घातली आणि आयुष्याच्या नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. या एपिसोडचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मालिकेत मुक्ताच्या अटीनुसार मिहीर पोलिसांना शरण जातो आणि मग ती सागरसोबत लग्न करायला तयार होते. ज्यामुळे गोखले- कोळी कुटुंबात लगीनघाई सुरु झाली आहे. केवळ सईसाठी मुक्ता- सागर लग्नाला होकार देतात. लग्न कोणत्या पद्धतीने होणार..? यावरून भांडण होणार अशी चिन्ह दिसताचं सागरचे वडील चिठ्ठ्या उठवण्यासाठी सांगतात. आता जी चिठ्ठी येईल त्या पद्धतीने हे लग्न होणार आहे. दरम्यान मालिकेच्या नव्या प्रोमोत मुक्ताचे वडील तिला अंगठी दाखवत म्हणतात, ‘ही अंगठी सागरसाठी, कशी वाटते सांग..?’ यावर मुक्ता म्हणते, ‘बाबा ही अंगठी आईने तुझ्यासाठी केलीये’. तर मुक्ताचे वडील म्हणतात, ‘आहे ना ही स्पेशल अंगठी..? मग ती स्पेशल माणसालाच द्यायला हवी’. यावर मुक्ता म्हणते, ‘ज्याला प्रेमाची किंमत नाही, तो काय या अंगठीची किंमत करणार..?’

तर दुसरीकडे सागर- सईची भेट होताना दिसतंय. यावेळी सई तिच्या बाबाला म्हणजे सागरला तिने बनवलेली एस नावाची अंगठी देते. याशिवाय मालिकेचा आणखी प्रोमो समोर आलाय. यामध्ये मुक्ता- सागरचा साखरपुडा पहायला मिळतोय. साखरपुड्यात मुक्ता तिच्या बाबांनी सागरसाठी दिलेली स्पेशल अंगठी त्याच्या बोटात घालते. तर सागर सईने दिलेली अंगठी मुक्ताला घालतो. हे पाहून मिहिका म्हणते की, ‘हे काय लहान मुलांसारख..?’ त्यावर सागर म्हणतो, ‘सईने बनवली आहे’. हे ऐकून मुक्ता म्हणते, ‘साखरपुड्यामधली सगळ्यात मोठी गोष्ट मला सईकडून मिळाली आहे. एस फॉर सई’. त्यानंतर सागर म्हणतो की, ‘सईने ही अंगठी माझ्यासाठी बनवली आहे. एस फॉर सागर’. त्यावर मुक्ता म्हणते, ‘माझ्यासाठी एस फॉर सईचं राहील’. अशाप्रकारे मुक्ता- सागरचा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडतो. पण हे पाहून सावनी काय रिअ‍ॅक्ट करणार..? हे पाहणे उत्कंठावर्धक आहे.