‘शांत समुद्र, हातात हात अन…’; लग्नाच्या वाढदिवशी प्रवीण तरडेंना पत्नीनं दिलं रोमँटिक सरप्राईज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी त्यांची पत्नी स्नेहलसोबत नुकताच त्यांच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त स्नेहल तरडे यांनी सोशल मीडियावर अतिशय गोड आणि तितकीच रोमँटिक पोस्ट शेअर करत पती प्रवीणला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांची हि पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. यानंतर आता स्नेहलने या खास दिवशी प्रविण यांना कोणतं खास सरप्राईज दिलं..? ते समोर आलं आहे.

दिग्दर्शक- अभिनेता प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल सोशल मीडियावर फार सक्रिय असते. अनेकदा ती वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग, किस्से आणि अनुभव शेअर करताना दिसते. अलीकडेच स्नेहल आणि प्रवीण यांच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस झाला. यानिमित्त स्नेहलने पती प्रविणला एक खास रोमॅण्टिक सरप्राईज दिलं. हे सरप्राईज होत बीचवर कॅन्डल लाईट डीनर. या खास सरप्राईजचा एक खास व्हिडीओ स्नेहलने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जो व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर प्रवीण आणि स्नेहल यांच्या रोमॅण्टिक कॅन्डल लाईट डीनरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी प्रविण तरडे यांनीदेखील लाडक्या बायकोच्या बोटामध्ये अंगठी घालून तिला लग्नाच्या वाढदिवसाचे खास गिफ्ट दिले आहे. स्नेहलने लग्नाच्या १४ व्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याला समुद्र किनारी कॅन्डल लाइट डिनरचं सरप्राईज देऊन प्रेम व्यक्त केलं. जे पाहून प्रविण तरडे भारावून गेले. ‘डार्लिंग तुला विशेष वाटण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन..’ असे लिहत स्नेहलने हा व्हिडो शेअर केला आहे.