थिएटरमध्ये 3 वेळा ‘अ‍ॅनिमल’ पाहिल्याने हेमांगी ट्रोल झाली; प्रत्युत्तर देत म्हणाली, ‘फक्त तुलनाच…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ने जगभरात ४०० कोटींची कमाई केल्याचे समोर आले आहे. रणबीरचा हा सिनेमा अनेक कलाकार मंडळींनी देखील पाहिला. ज्यामध्ये मराठी अभिनेत्री हेमांगी कवीचा समावेश आहे. एकदा नव्हे तर तब्बल तीनवेळा तिने हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहिला आहे. ज्यामुळे नेटकरी हेमांगीची शाळा घेताना दिसत आहेत.

एकीकडे ‘अ‍ॅनिमल’ सिनेमावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. शिवाय अनेक लोकं या सिनेमावर टिका करत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने ‘अ‍ॅनिमल’ हा सिनेमा तीन वेळा थिएटरमध्ये पाहिल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी सुनावल्यानंतर हेमांगी थोडीच गप्प बसणार आहे. तिनेसुद्धा या टीकांवर प्रत्युत्तर दिलं आहे. काही दिवसांपुर्वी हेमांगीने ‘अ‍ॅनिमल’ सिनेमा ३ वेळा पाहिल्याचं सांगितलं होतं. त्याखाली एका नेटकऱ्याने, ‘झिम्मा 2 किती वेळा बघितलास..?’ असा सवाल केला.

यावर रिप्लाय करताना हेमांगी म्हणाली कि, ‘मी निदान पाहिला तरी! आपण ना फक्त तुलनाच करत बसणार आहोत. तरीही मला सांगायला आवडेल. सैराट ६ वेळा.. धर्मवीर ४ वेळा.. घर बंदूक बिर्याणी ३ वेळा.. कोर्ट ३ वेळा.. बापजन्म २ वेळा.. नदी वाहते ३ वेळा… आणि हो सगळे थिएटरमध्ये पाहिले. आणि त्यावर पोस्ट पण टाकल्या.. ही तुलना बंद करुन आपलं बॉक्स ऑफीस कलेक्शन छान कसं होईल यावर लक्ष द्यायला पाहिजे..’. हेमांगीच्या रिप्लायनंतरदेखील सुरूच आहे.