हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांचा काही दिवसांपूर्वीच थाटात विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बिग बॉसच्या घरात मैत्री आणि त्यानंतर प्रेमात पडलेलं हे जोडपं अखेर अधिकृतरीत्या एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकल्याने चाहते फार खुश झाले. लग्नानंतर दोघेही आपल्या संसारात रमले आहेत. नुकताच प्रसादने लाडक्या बायकोसाठी एक पदार्थ बनवला होता. ज्याचा फोटो अमृताने शेअर केला आहे.
प्रसाद आणि अमृता दोघेही सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यामुळे प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी ते आपल्या चाहत्यांसोबत या माध्यमातून शेअर करताना दिसतात. नुकताच लग्नानंतर पहिल्यांदा प्रसादने अमृतासाठी एक स्पेशल खूप स्पेशल असा खाद्यपदार्थ बनवला. ज्याचा फोटो अमृताने तिच्या अधिकृत हॅण्डल इंस्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर केला आहे. प्रसादने अत्यंत पौष्टिक असा पदार्थ बनवत बायकोच्या तब्येतीची पूर्ण काळजी घेतली आहे. त्यामुळे अमृताने या पदार्थाचा फोटो शेअर करत ‘आरोग्यदायी जेवण’ असे कॅप्शन दिले आहे.
फरसबी, मटार, फुलकोबी, गाजर, दही, मेयोनीज, उकडलेले अंडे असे प्रोटीनपूर्ण पदार्थ वापरून प्रसादने ही खास डिश बनवली आहे. हा फोटो शेअर करत अमृताने प्रसादकडे ‘शेफ, कृपया ही रेसिपी शेअर करा’, अशी मागणीसुद्धा केली आहे. याआधीसुद्धा प्रसादने अमृतासाठी वेगवेगळे पदार्थ बनवल्याचे तिने स्वतःच सांगितले होते. अगदी कांदेपोहे कार्यक्रमाचा किस्सादेखील तिने शेअर केला होता. शिवाय एका मुलाखतीत अमृता म्हणाली होती, ‘प्रसाद खूप चांगलं जेवण बनवतो. पण मला स्वयंपाकाची म्हणावी तशी आवड नाहीये. त्याला सगळंच येतं. तो घरही खूप चांगलं अन् नीटनेटकं ठेवतो’.