‘हे कान पिळणं कायम लक्षात..’; मुग्धाने शेअर केला थोरल्या बहिणीच्या लग्नातील ‘त्या’ खास विधीचा फोटो


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या या वर्षातील लग्नाचे काही शेवटचे मुहूर्त उरले आहेत. त्यामुळे अनेक मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. ज्यामध्ये साहजिकच काही कलाकारांचा देखील समावेश आहे. नुकतेच ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून आपल्या गोड गळ्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका मुग्धा वैशंपायनच्या मोठ्या बहिणीचं अगदी थाटामाटात लग्न पार पडले. मुग्धाच्या बहिणीचे नाव मृदुल असून तिने विश्वजित जोगळेकरसोबत लग्नगाठ बांधली. दरम्यान मुग्धाने सोशल मीडियावर कानपिळीच्या विधीचा फोटो शेअर आणि त्यासोबत भन्नाट कॅप्शन शेअर केले आहे.

मुग्धाने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आपल्या जीजूचा कान पिळतानाचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये वैशंपायन भावंड मृदुलाच्या नवऱ्याचा कान पिळताना दिसत आहेत. हा फोटो अतिशय खोडकर आणि तितकाच गोड दिसतो आहे. हा फोटो शेअर करताना मुग्धा वैशंपायनने लिहिलं आहे कि, ‘जीजचा कान पिळताना आम्ही वैशंपायन भावंड… माझी खात्री आहे, हे कान पिळणं कायम लक्षात राहणारे जीजच्या आणि सगळ्यांच्याच…’. मुग्धाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून तिच्या मोठ्या बहिणीला म्हणजेच मृदुल वैशंपायनला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी मुग्धाने गायक प्रथमेश लघाटेसोबत ‘आमचं ठरलंय’ म्हणत आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर त्यांच्या केळवणाचे अनेक फोटो समोर आले. तेव्हापासून त्यांच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. पण त्यापूर्वी मुग्धाची मोठी बहीण मृदुल वैशंपायन लग्नबंधनात अडकली असून तिच्या मेहंदी, हळद आणि लग्नाचे फोटो तसेच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. लग्नात मुग्धाच्या बहिणीने लाल रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाचा शेला घेत पारंपरिक लूक केला होता. तर मृदुलच्या पतीने लाल रंगाचं सोवळं आणि उपर्ण परिधान केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.