‘दृश्यम’ फेम अभिनेत्यासोबत साऊथच्या सिनेमात झळकणार मराठमोळी अप्सरा; पहा पहिली झलक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वाची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हि सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने ती कलाविश्वात आघाडीवर पोहोचली. पण आता केवळ मराठी नव्हे तर साऊथमध्येही तीची चर्चा आहे. आतापर्यंत अनेक मराठी कलाकारांनी साऊथमध्ये काम केले आहे. यांनतर आता सोनाली कुलकर्णी देखील साऊथच्या सिनेमात झळकणार आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठीनंतर आता लवकरच मल्याळम सिनेसृष्टीत झळकणार आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार अशी ओळख असणाऱ्या अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे. ‘दृश्यम’ या सिनेमात मोहनलाल झळकले होते आणि त्यांची या चित्रपटातील भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने आता मोहनलाल परत एकदा अत्यंत अनोख्या भूमिकेतून समोर येत आहेत आणि याच सिनेमात त्यांच्यासोबत सोनाली कुलकर्णी झळकणार आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच मल्याळम सिनेसृष्टीत काम करताना दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोनालीच्या साऊथ सिनेसृष्टीत पदार्पणाची चर्चा सुरु होती. अखेर तिच्या या सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे. सुपरस्टार मोहनलाल यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. ‘मलाइकोट्टई वालीबान’ या सिनेमाचा पहिला लूक आणि टीझर सोनालीने इंस्टाग्रामवर शेअर केला असून व्हायरल होत आहे. माहितीनुसार, पुढच्या वर्षी २५ जानेवारी २०२४ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.