लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाला संकर्षण कऱ्हाडेची भेट; म्हणाला, ‘मी पहिल्यांदाच..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. मालिका, सिनेमा, नाटक अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा संकर्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. आताही त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तो रत्नागिरीला गेल्याचं त्याने सांगितलं आहे. यावेळी त्याने लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानी भेट दिली आणि त्यानंतर संकर्षणने हि खास पोस्ट शेअर केली आहे.

संकर्षणने लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाचा फोटो शेअर करत लिहिलंय, ‘ ”रत्नागिरी” शहरात आल्याआल्या दिवसाची सुरवात अशी झाली.. लोकमान्यं टिळक जन्मस्थान आज मी पहिल्यांदाच पाहिलं.. कित्ती छान वाटलं .. मग शहरातली फेमस “मिसळ आंबोळी” खाल्ली.. वाह .. मज्जा आली …. आता आज रात्री १० वा. प्रयोग तो ही खणखणीत होणार…’. संकर्षणच्या या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स पहायला मिळत आहेत. या पोस्टमध्ये संकर्षणने त्याच्या ‘नियम व अटी लागू’ नाटकाच्या प्रयोगांची माहिती दिली आहे.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्याच ‘नियम व अटी लागू’ हे नाटक सुरु आहे. या नाटकात संकर्षण सोबत अभिनेत्री अमृता देशमुख देखील पाहायला मिळते आहे. या नाटकाचे रंगभूमीवर तुफान प्रयोग सुरु असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. याशिवाय ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमातदेखील संकर्षण दिसतो आहे. यामध्ये संकर्षणसोबत स्पृहा जोशी रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.