Sonalee Kulkarni | ‘नवऱ्यासोबत जाऊ नको…’ चाहतीच्या त्या प्रश्नावर सोनाली कुलकर्णीने दिले मजेशीर उत्तर


Sonalee Kulkarni | अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही तिच्या अभिनयामुळे आणि डान्समुळे नेहमी चर्चेत असते. त्याचप्रमाणे सोनाली सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ दिसतात. तिचे अनेक चाहते देखील तिच्या पोस्टला रिप्लाय देत असतात. सोनाली सध्या दुबईमध्ये राहते आणि ती तेथीलच अनेक फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने जांभळ्या रंगातील साडीमधील फोटो पोस्ट केले आहे. यावर तिला एका चाहत्याने केलेली कमेंट आणि सोनालीने त्यावर दिलेल्या रिप्लाय खूपच चर्चेत आहे.

हेही वाचा – जुन्या यारीचा नवा चेहरा घेऊन आलंय ‘मुसाफिरा’ सॉंग; ऎका आणि रिफ्रेश व्हा

सोनाली इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्याचप्रमाणे गळ्यात मंगळसूत्र घातले आहे छोटीशी टिकली लावलेली आहे. असा एक तिचा खूपच सुंदर लूक पाहायला मिळतोय. हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “बीईंग वेरी मच इंडियन इन दुबई”

तिच्या या फोटोवर तिला एका चाहतीने कमेंट करत लिहिले आहे की, “काही पण कर पण नवऱ्यासोबत बिग बॉसमध्ये जाऊ नको” यावर सोनालीने उत्तर देत लिहिले आहे की, “एकटी पण जाणार नाही कधी.”

सोनालीच्या या उत्तरावर अनेक शेतकऱ्यांनी रिप्लाय दिलेला आहे. सोनाली लवकरच दक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये आपल्याला दिसणार आहे. तिचा हा पहिलाच साउथ सिनेमा आहे. ती सुपरस्टार मोहनलाल सोबत या चित्रपटात दिसणार आहे. वालीबन या चित्रपटाचे नाव आहे. तसेच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टिजर रिलीज झाला आहे. आता सोनालीच्या चाहत्यांना दिला साउथ इंडस्ट्रीमध्ये पाहण्याची खूपच उत्सुकता लागलेली आहे.