Prarthana Behere | लाल इश्क ! तळपत्या उन्हात वाळवंटात प्रार्थना बेहेरेच्या कातिल अदा


Prarthana Behere | मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतून काम करून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. या आधी ती शेवटची माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेत दिसली होती. प्रार्थना सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते l. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अपडेट ती तिच्या चाहत्यांना देत असते. असाच एक प्रार्थना एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे.

प्रार्थना सध्या अनेक ब्रँडसाठी फोटोशूट करताना दिसत असते. आणि त्या फोटोशूटमधील काही निवडक फोटो तिच्या चाहत्यासोबत देखील शेअर करत असते. परंतु आत्ताच केलेल्या एका व्हिडिओमुळे प्रार्थना चर्चेत आलेली आहे. प्रार्थना आणि वाळवंटामध्ये लाल रंगाचा ड्रेस घालून हे फोटो व्हिडिओ शूट केलेला आहे. तो सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.

हेही वाचा – जुन्या यारीचा नवा चेहरा घेऊन आलंय ‘मुसाफिरा’ सॉंग; ऎका आणि रिफ्रेश व्हा

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती वाळवंटामध्ये चालताना दिसत आहे. तिने लाल रंगाचा वेस्टर्न गाऊन घातलेला आहे. तसेच या व्हिडिओच्या बॅकग्राऊंड ओ जाना हे गाणं सुरू आहे. तिचा हा व्हिडिओ आणि लूक तिच्या हातांना खूपच आवडला आहे l. आणि तिच्या या व्हिडिओवर कमेंट करून तिच्या कौतुक करत आहे.

प्रार्थना आणि छोट्या पडद्यावर अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ती पवित्र रिश्ता या गाजलेल्या मालिकेत झळकली होती. त्यानंतर तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले.