धक्कादायक!! ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन; राहत्या घरात मृतावस्थेत आढळले


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाल्याचे हे वृत्त आहे. शुक्रवारी तळेगाव दाभाडे येथील सदनिकेत ते मृतावस्थेत सापडल्याची माहिती मिळत आहे. रवींद्र महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर राहत होते. गेल्या दोन दिवसांपासून या सदनिकेतून वास येत असल्याची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली आणि तळेगाव पोलिस घटनास्थळी पोहोचले. सदनिकेचा दरवाजा तोडताच रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने सिनेविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Hello Bollywood – हिंदी (@hellobollywood.in)

अभिनेते रवींद्र महाजनी यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचे निधन हि बाब मराठी सिनेसृष्टीसाठी अत्यंत दुःखद घटना आहे. रवींद्र महाजनी गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून एकटेच राहत होते. पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे ते भाडेतत्वावर राहत होते. याच फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहेत. दरम्यान त्यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनी याला पोलिसांकडून माहिती देण्यात आली असून तो व कुटुंबीय तळेगावकडे रवाना झाले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शविच्छेदनानंतर रवींद्र महाजनी यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनावर मराठी सिनेसृष्टीतून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेते रवींद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘झुंज’ या मराठी चित्रपटाद्वारे सिनेक्षेत्रात पदार्पण केले. अतिशय देखणे आणि गुणी असे ते अभिनेते ठरले. पुढे ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या.