सई ताम्हणकर बॉयफ्रेंडसोबत एन्जॉय करतेय स्पेन व्हॅकेशन..?; फोटोंमुळे चर्चांना उधाण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर हि सोशल मीडियावर फार सक्रिय असते. बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून सईची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. सईने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वातदेखील तिची जागा निर्माण केली आहे. यामुळे सईचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. केवळ सिनेमा, शो आणि ग्लॅमरस लूकमुळेच नव्हे तर अनेकदा साई तिच्या खाजगी आयुष्यातील काही गोष्टींमुळे चर्चेत येत असते. गेल्या काही दिवसांपासून सई तिच्या आयुष्यातील एका महत्वाच्या व्यक्तीला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. अशातच जेव्हा तो फोटो समोर आला तेव्हा या चर्चांना आणखीच जोर आला आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

A post shared by Sai (@saietamhankar)

अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या स्पेनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. पण ती एकटीच फिरायला गेलीये यावर विश्वास ठेवणं जरा कठीण आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सई ताम्हणकर निर्माता अनिश जोगला डेट करत असल्याची चर्चा एकदम जोरात सुरु आहे. याचं कारण असं कि, दोघेही त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांबरोबरचे विविध फोटो शेअर करत असतात. अद्याप दोघांपैकी कुणीच आपल्या नात्याची जाहीरपणे कबुली दिलेली नाही. पण फोटो पाहून नेटकरी त्यांच्यातील नात्याला नाव देताना दिसतात. त्यांच्या अफेअरच्या चर्चेदरम्यान आता स्पेन व्हॅकेशनने आणखीच भर टाकली आहे.

स्पेनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करणाऱ्या सईने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर अनेक स्टोरी शेअर केल्या आहेत. शिवाय काही पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांसोबत स्पेनमधील काही खास स्पॉटचे फोटो शेअर केले आहेत. पण या फोटोंवरून सई एकटीच स्पेनमध्ये फिरतेय असं वाटत आहे. पण असं बोललं जातंय कि, सई आणि अनिश दोघेही स्पेनमध्ये फिरायला गेले आहेत आणि ते एकत्र आहेत. यावर शिक्कामोर्तब केलाय त्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोने.

अनिश आणि सई यांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये स्पेनमधील फोटो शेअर केले आहेत. यातील सगळे फोटो वेगळे होते. पण त्यातलाच एक फोटो दोघांनीही शेअर केला आहे. जो पाहून ते एकत्र स्पेनमध्ये व्हॅकेशनसाठी गेले आहेत असे म्हटले जात आहे. फोटोंवरून तर समजतंय कि सई आणि अनिश यांचं स्पेनमधील व्हॅकेशन मस्त चालू आहे आणि ते एकत्र आहेत. पण अधिकृतपणे ते एकत्र असल्याचे कधी जाहीर करतात याची प्रतीक्षा त्यांच्या चाहत्यांना आहे.