म्हातारा येडा झालाय..!! ‘जमाल कुडू’ गाण्यावर नारकर जोडप्याचा डान्स; ट्रोलर्सने पुन्हा साधला निशाणा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडपे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेता अविनाश नारकर हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. कायम वेगवेगळ्या गाण्यावरील रिल्स शेअर करून हे जोडपं चर्चेत येत असतं. त्यांचे अनेक रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नारकर जोडप्याच्या रिल्समूळे अनेकदा ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत असतात. नुकतेच या जोडप्याने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील ट्रेंडिंग गाणे ‘जमाल कुडू’वर रील केले आहे. जे तुफान व्हायरल झाले आहेत आणि पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत.

अभिनेता अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी ‘अॅनिमल’ या चित्रपटामधील ‘जमाल कुडू’ गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. बॉबी देओलच्या म्हणजेच अबरारच्या या एन्ट्री साँगला आधीच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. त्यामुळे युट्युबवर हे ‘जमाल कुडू’ गाणं ट्रेंडिंगवर आहे. अशातच बहुचर्चित नारकर जोडप्याने या गाण्यावर डान्स करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या रिलमध्ये अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर आणि अभिनेत्री अश्विनी कासार हे गाणं एन्जॉय करत डान्स करताना दिसत आहेत.

नारकरांनी या व्हिडीओला कॅप्शन देताना लिहिलं आहे कि, ‘Dancing cause We are happy..!!!’ अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांचा हा रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी पुन्हा एकदा या जोडप्याला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘सीरिअल च काम सोडल असाल तर नवीन पिचर काढ ऍनिमल pro’. तर आणखी एकाने लिहिले, ‘नटरंग 2 ची जय्यत तय्यारी सुरु!! awaiting!!!’. अन्य एकाने म्हटले, ‘मला तर बिलकुल आवडत नाही यांचा डान्स…नुसती फालतुगिरी वाटते’. आणखी एकाने लिहिलं, ‘हा बाबा खूपच रंगीला आहे’. तर आणखी एका नेटकाऱ्याने, ‘म्हातारा येडा झालाय’, असे म्हटले आहे.