श्रेयस तळपदेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; पत्नीने मानले मदतकर्त्यांचे आभार, म्हणाली…


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला १४ डिसेंबर २०२३ रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. यांनतर मुंबईतील एका रुग्णालयात त्याला तात्काळ दाखल केले गेले आणि त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. श्रेयसच्या प्रकृतीबाबत बातम्या पसरल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर आता श्रेयस तळपदेला डिस्चार्ज देण्यात आला असून तो सुखरूप त्याच्या घरी परतला आहे. याबाबत श्रेयसची पत्नी दीप्तीने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. यामध्ये तिने कठीण काळात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मनात श्रेयस घरी परतल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

दीप्तीने या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘माझं जीवन, माझा श्रेयस पूर्णपणे बरा झाला आहे आणि घरी परतला आहे. कोणावर विश्वास ठेवायचा यावरून मी श्रेयसशी नेहमीच वाद घालत असे. पण आज मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे आणि ते उत्तर देव आहे. ही भयंकर घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी देव माझ्याबरोबर होता. आता मी कधीच त्याच्या अस्तित्वावर शंका घेणार नाही की तो आहे की नाही. त्या संध्याकाळी ज्यांनी मला मदत केली त्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो. मी एका व्यक्तीकडे मदत मागितली आणि १० हात मदतीला आले. श्रेयस गाडीच्या आत पडलेला होता, पण ते लोक कोणाला मदत करत आहेत हे त्यांना माहीत नव्हतं, तरी ते मदतीला धावून आले’.

‘मी त्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छिते जे त्या दिवशी माझ्यासाठी देव बनून मदतीला आले होते. मला आशा आहे की माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हा सर्वांची मी सदैव ऋणी राहीन. मुंबई हे असं एक शहर आहे, ज्याने इथं आम्हाला एकटं सोडलं नाही तर आमची काळजी घेतली. मी आमचे सर्व मित्र, कुटुंबातील सदस्य आणि मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील मंडळींचे आभार मानते. हे लोक आपलं काम सोडून आमच्या मदतीला आले होते. मी बेले व्ह्यू हॉस्पिटलच्या टीमचे आभार मानू इच्छिते, ज्यांनी त्वरित उपचार करून माझ्या पतीला वाचवले. सर्व डॉक्टर, परिचारिका, भाऊ, मुलं, मावशी, प्रशासन आणि सुरक्षा टीम तुमचं काम पैशांत मोजता येऊ शकत नाही’. तसेच या पोस्टमध्ये दीप्तीने श्रेयससाठी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येक चाहत्याचे आभार मानले आहेत.