‘हिंसक पुरूष पात्रांच्या काळात…’; ‘झिम्मा 2’च्या पात्रांविषयी बोलताना हेमंतने साधला ‘अ‍ॅनिमल’वर निशाणा..?


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता हेमंत ढोमेचा ‘झिम्मा २’ हा सिनेमा या वर्षातील बॉक्स ऑफिस गाजवणारा एक सिनेमा ठरला. थिएटरमध्ये रणबीर कपूरचा बिग बजेट ‘अ‍ॅनिमल’ हा सिनेमा रिलीज होऊनही ‘झिम्मा २’ने मात्र तग धरली. यासाठी चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव झाला. अशातच हेमंत ढोमेने ‘झिम्मा २’ संबंधी एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. पण या पोस्टमधून त्याने गुपचूक रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ वर निशाणा साधल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

अभिनेता हेमंत ढोमेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर ‘झिम्मा 2’मधील कलाकारांचा फोटो शेअर करत हि पोस्ट केली आहे. यामध्ये हेमंतने लिहिले आहे कि, ‘सगळ्या हिंसक पुरूष पात्रांच्या काळात प्रेम करणारा कबीर… अखेरच्या श्वासापर्यंत आयुष्य सुंदर करणारी इंदू… आपणंच घालून घेतलेली बंधंनं हळूहळू सैल करणारी निर्मला… नव्या रूपात नवं बाईपण जपणारी मनाली… हरवून मग स्वतःला नव्याने सापडलेली मिता… मैत्रीसाठी कोणाशीही दोन हात करणारी वैशाली… Unapologetically honest जगणारी कृतिका… घर सांभाळणारी, आपल्या माणसांवर प्रेम करणारी तानिया… ही सगळी पात्र तुम्ही आपली केलीत… कोणाला कोणीतरी आपली ताई, आई, मावशी, आत्या, मैत्रीण वाटली… कोणालातरी वाटलं आपणंच आहोत!’

या पोस्टच्या शेवटी हेमंतने लिहिलं आहे कि, ‘तुमच्यातलं आणि पडद्यामधलं अंतर पुसून टाकणारी ही पात्र माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात जास्त आनंद देणारी आहेत… ही पात्र मेहनतीने, ताकदीने, कधी रूसत, कधी भांडत, कधी रडत, कधी हसत, कधी मस्ती करत… पण प्रेमानं मायेनं साकारणाऱ्या माझ्या या ८ कलाकारांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी ही पोस्ट! Love you all, तुम्ही माझी पात्र जिवंत करून Relatable केलीत!’. हेमंतच्या ‘झिम्मा २’ या चित्रपटाचे यश पाहता हा सिनेमा अनेक बिग आहेत हिंदी सिनेमांना पुरून उरला असे म्हणायला हरकत नाही.