Gautami Deshpande | ‘सिक्रेट सांता लवकर आला’, थेट मेहेंदी सोहळ्यातील फोटो शेअर करून गौतमीने चाहत्यांना दिला सुखद धक्का


Gautami Deshpande| सध्या सर्वत्र लगीन घाई चालू आहे. तसेच त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार देखील आता लग्न करत आहे. अशातच माझा होशील ना या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे ही देखील लग्न बंधनात अडकणार आहे. नुकतेच तिने तिच्या मेहंदी फंक्शन मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का बसलेला आहे. गौतमी ही भाडिपा फेम स्वानंद तेंडुलकर यांच्यासोबत लग्न करणार आहे. ही गोड बातमी तिने सोशल मीडियावर नुकतेच शेअर केलेली आहे.

याआधी देखील गौतमी आणि स्वानंद यांचं लग्न होणार आहे. अशी शंका त्यांच्या चाहत्यांना आली होती. आणि ती शंका आता खरी ठरलेली आहे. गौतमीने स्वानंदसोबतचा फोटो शेअर करून सगळ्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे. तिने तिच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो शेअर केलेले आहेत.

या फोटोमध्ये गौतमीनी गुलाबी रंगाचा लेहंगा घातलेला आहे. तर स्वानंदने गुलाबी रंगाचे जॅकेट आणि पांढरा कुर्ता घातलेला दिसत आहे. हे दोघेही फोटोमध्ये खूप गोड दिसत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करून तिने “सिक्रेट सांता लवकर आला,” असे कॅप्शन दिलेले आहे तसेच swag हा hashtag देखील वापरलेला आहे.

हेही वाचा – स्त्रीभ्रूण हत्येवर भाष्य करणारा ‘Y’ चित्रपट येतोय टीव्हीवर; जाणून घ्या कधी..? कुठे..? पाहता येणार

स्वानंद तेंडुलकर हा मराठीतील पहिला डिजिटल चैनल भाडिपा बिजनेसचा हेड आहे. आता त्या दोघांचं लग्न कसं जुळलं हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना खूप उत्सुकता आहे हे दोघेही आता 25 डिसेंबरला लग्न बंधनात अडकणार आहे.