Navardev Teaser | कधी भेटणार नवरदेवाला नवरी?, ‘नवरदेव’ चित्रपटाचा उत्साह वाढणारा टिझर रिलीझ


Navardev Teaser | 2023 मध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांनी धुमाकूळ घातला. यामध्ये झिम्मा 2, वेड, बाई पण भारी देवा, वाळवी या चित्रपटांचा समावेश आता आहे.आता 2024 मध्ये देखील पंचक आणि ओले ओले या चित्रपटाचे सगळ्यांना उत्सुकता आहे. या सोबतच आणखी एक उत्साह वाढणारा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आज राष्ट्रीय कृषी दिनाच्या निमित्ताने नवरदेव या चित्रपटाचा टिझर रिलीज झालेला आहे.

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. परंतु या कृषीत राबणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला आजकाल नवरी मिळत नाही. या गंभीर प्रश्नावर भाष्य करणारा हा नवरदेव चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. कृषी दिनाच्या निमित्ताने झालेला आहे. हसता हसता एका गंभीर विषयाकडे हा चित्रपट आपल्याला जाताना दिसणार आहे.

हेही वाचा – पूजा सावंतने शेअर केला होणाऱ्या नवऱ्यासोबतचा रोमँटिक फोटो; म्हणाली, ‘….मला माहितेय’

आज-काल शेतकऱ्यांचे सगळ्यांना कौतुक असते वाईट वाटते. परंतु त्या शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करण्यासाठी कुठलीही मुलगी तयार नसते. आणि याच विषयावर दिग्दर्शक राम खाटमोडे यांनी योग्य पद्धतीने विषयाचे महत्त्व पटवून दिले आहे. चित्रपटासाठी जर उत्साह वाढवणारा आहे. त्यामुळे आता हा चित्रपट कसा असणार आहे याची कथा नक्की काय असणार आहे हे पाहण्यासाठी सगळेजण खूप उत्सुक आहे.

शेतीचे शिक्षण घेतलेला एका मुलाला कोणत्या कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते. याचीही कथा आहे या चित्रपटामध्ये आपल्याला क्षितिष दाते, प्रवीण तरडे, प्रियदर्शनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक अशा कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या 26 जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.