Swanandi Tikekar | गौतमी पाठोपाठ स्वानंदीची लगीनघाई, मेहेंदी समारंभाचे फोटो व्हायरल


Swanandi Tikekar | सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लग्न सराई चालू आहे. नुकतेच सारेगमप मधील लिटिल चॅम्प्समध्ये प्रथमेश लगाटे आणि मुग्ध यांनी लग्न केले. आता एकीकडे गौतमी देशपांडेचे लग्नाचे कार्यक्रम चालू आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री स्वानंद टिकेकर हिच्या देखील लग्नाच्या सगळ्या विधींना सुरुवात झालेली आहे.

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी हे लग्न बंधनात अडकणार आहे. आणि नुकतेच त्यांच्याकडे मेहंदीच्या कार्यक्रम चालू झालेला आहे. काही दिवसांपूर्वीच्या दोघांनी साखरपुडा केला होता. आणि त्यांच्या साखरपुड्याचे फोटो देखील शेअर केले होते. अशातच त्यांच्याकडे आता मेहंदीचा समारंभ पार पडला आहे.

हेही वाचा – Navardev Teaser | कधी भेटणार नवरदेवाला नवरी?, ‘नवरदेव’ चित्रपटाचा उत्साह वाढणारा टिझर रिलीझ

स्वानंदी आणि आशिष यांनी त्यांच्या नावाचा आनंदी हा hashtag तयार केलेला आहे. तिने सुंदर असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पाहू शकता की, स्वानंदीने लाल रंगाचा लेहंगा घातलेला आहे. यासोबत तिने ड्रेसला मॅचिंग अशी ज्वेलरी घातलेली आहे. आणि तिचा लुक पूर्ण केला आहे. तर दुसरीकडे आशिषने देखील लाल रंगाचा कुर्ता घातलेला आहे. ते दोघेही या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.

खास गोष्ट म्हणजे यांच्या मेहंदी समारंभात त्यांच्या फुलांच्या सजावटीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. या समारंभात खूपच सुंदर अशी सजावट केलेली आहे. ते दोघेही 25 डिसेंबरला लग्न करणार आहेत.