नुसता आनंद!! स्वानंदीच्या मेहंदी- संगीत सोहळ्यांमध्ये आई- वडिलांच्या डान्सने लावले चार चाँद; पहा व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. महिन्याभरापूर्वी अमृता देशमुख- प्रसाद जवादे, सुरुची अडारकर- पियुष रानडे लग्नबंधणार अडकले. तर काही दिवसांपूर्वी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी सुखी संसाराची सुरुवात केली. यानंतर आता अभिनेत्री गौतमी देशपांडे- अभिनेता स्वानंद तेंडुलकर आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर – गायक आशिष कुलकर्णी आज लग्नबंधणार अडकणार आहेत. दरम्यान त्यांच्या लग्नाआधीच्या विधी आणि सोहळ्याचे फोटो तसेच व्हिडीओ व्हायरला होत आहेत.

काल रविवारी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा मेहंदी सोहळा पार पडला. त्यांनतर संध्याकाळी संगीत सोहळा देखील जल्लोषात पार पडला. त्यामधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्वानंदीची वडील अभिनेता उदय टिकेकर आणि तिची आई आरती अंकलीकर- टिकेकर डान्स करताना दिसत आहे. मेहंदीची आणि संगीतची ही क्रेझी संध्याकाळ दोन्ही कुटुंबांनी एकत्र एन्जॉय केली. या सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. स्वानंदी आणि आशिष दोघांनीही आपल्या मेहंदी तसेच संगीत सोहळ्यात अत्यंत आनंद अनुभवला आहे.

स्वानंदीची आई म्हणजेच प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर- टिकेकर यांनीदेखील मेहंदी सोहळ्यात आणि संगीत सोहळ्यात डान्स करत लेकीच्या आनंदात चार चाँद लावले आहेत. ‘टीआरपी मराठी’ या इंस्टाग्राम पेजवर स्वानंदीच्या आई आरती अंकलीकर- टिकेकर यांचा मेहंदी सोहळ्यातील डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तर स्वानंदीने स्वतःच्या इंस्टाग्राम हँडलवर संगीत संध्याचे व्हिडीओ शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. माहितीनुसार, आज २५ डिसेंबर २०२३ रोजी स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी लग्न बंधनात अडकणार आहेत. चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला आतुर झाले आहेत.