Kishori Shahane | ‘कुटुंबात नव्या सदस्याची एंट्री’ किशोरी शहाणे यांनी खरेदी केली आलिशान कार, पाहा व्हिडीओ


Kishori Shahane | 2023 हे अनेक मराठी कलाकारांसाठी खास ठरलेले आहे. अनेकांचे या वर्षी लग्न झाले आहे. तर अनेकांनी नवीन घर आणि गाडी खरेदी केली आहे. अशातच अशीच एक चांगली बातमी एका अभिनेत्रीने शेअर केली आहे ती म्हणजे अभिनेत्री किशोरी शहाणे.

किशोरी शहाणे यांनी एक नवीन आलिशान गाडी खरेदी केली आहे. याचा एक व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “आमच्या कुटुंबात नव्या सदस्यांची एन्ट्री.” व्हिडिओमध्ये किशोरी शहाणे यांचा मुलगा बॉबी हा देखील दिसत आहे. त्यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट करून त्यांना शुभेच्छा दिलेले आहेत आणि अभिनंदन देखील केलेली आहे.

हेही वाचा – Gautami Deshpande Marriage – झालं हो झालं!!! गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरचा थाटामाटात विवाह संपन्न; पहा फोटो

किशोरी शहाणे यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून त्यांचे एक वेगळे आणि आढळ स्थान निर्माण केलेले आहे. त्यांनी मराठीमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. यामध्ये प्रेम करूया खुल्लम खुल्ला, वाजवा रे वाजवा, बाळाचे ब्रह्मचारी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या त्या कैसे मुझे तुम मिल गये या हिंदी मालिकेमध्ये काम करत आहेत.