‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई!! हातावर रंगली प्रियकराच्या नावाची मेहंदी; पहा फोटो


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मनोरंजन विश्वात जोरदार लगीनसराई सुरु आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील मुहूर्तांवर अनेक कलाकार मंडळी लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत. गेल्या महिन्यात अमृता देशमुख- प्रसाद जवादे, सुरुची अडारकर- पियुष रानडे लग्न बंधनात अडकले. तर काही दिवसांपूर्वी प्रथमेश लघाटे- मुग्धा वैशंपायन यांनी लग्नगाठ बांधली. अशातच आज मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडूलकर तसेच स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी लग्न बंधनात अडकले. यानंतर आता आणखी एक अभिनेत्री लग्न करणार असल्याचे समोर आले आहे.

टीव्ही विश्वातील अभिनेत्री सोनल पवार लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. नुकताच तिचा मेहंदी सोहळा पार पडला आहे आणि या सोहळ्याचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनलच्या हातावर तिच्या नवऱ्याच्या नावाची मेंहदी रंगली आहे. अभिनेत्री सोनल पवार लवकरच तिचा प्रियकर समीर पालुष्टेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. आता सोनल आणि समीरच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे. तिचा मेंहदीचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला असून त्याचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

या मेहंदी सोहळ्याचे फोटो अभिनेत्री सोनल पवारने तिच्या अधिकृत सोशल मिडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यावेळी सोनलने केशरी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. सोनल आणि समीरच्या घरी लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून आज हळदी समारंभ होणार आहे. तर २८ डिसेंबर २०२३ रोजी सोनल आणि समीरच्या लग्नाचा बार उडणार आहे. समीर पालुष्टे हा एक बिझनेसमन असून तो स्पार्कल्स मीडियाचा फाऊंडर आणि सीईओ आहे. शिवाय तो डिजीटल मार्केटर आणि ब्रंँड कन्सलटंट म्हणुनदेखील काम करतो. तर सोनल टीव्ही अभिनेत्री असून ‘तुला पाहते रे, ‘रमा – राघव’ या मालिकेत झळकली आहे.