Bigg Boss’ने तोडलं पण ‘त्या’ खास दिवसाने पुन्हा जोडलं; रोहीत- रुचिराचं पॅचअप


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी सीजन ४ हा तुफान गाजला. या सीझनमध्ये सहभागी झालेला प्रत्येक स्पर्धक प्रेक्षकांना भावला. बिग बॉसच्या प्रत्येक सीजनमध्ये एक कपल असत किंवा बनतं, हे आपण जाणतोच. पण या सीजनमध्ये सहभागी झालेलं एक कपल इथे येऊन तुटल्याचे आपण पाहिले. ते म्हणजे अभिनेत्री रुचिरा जाधव आणि रोहित शिंदे. बिग बॉसच्या घरात एंटर झाल्यानंतर या दोघांमध्ये असे काही खटके उडाले की त्यांचं ब्रेकअप झालं आणि ते वेगळे झाले. रुचिराने तर एव्हिक्ट होताना रोहितकडे पाहिलं देखील नाही. त्यामुळे आता हे दोघे परत कधीच एकत्र येणार नाही असे सगळ्यांना वाटले. पण सोशल मीडियावर त्यांच्या अलीकडेच झालेल्या भेटीचे फोटो व्हायरल झाले आहेत. जे पाहून पॅचअप झाल्याचे दिसत आहे.

त्याचं झालं असं की, १३ जुलै रोजी अभिनेत्री रुचिरा जाधव हीचा वाढदिवस होता. यानिमित्त रोहित रुचिराची डेट- भेट झाली आहे. होय. रुचिराने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. ज्यामध्ये तिने वाढदिवसाचे खास फोटो शेअर केले होते. त्यात तिच्यासोबत रोहित दिसत आहे आणि त्यांनी एक विलामध्ये रोमँटिक सेलिब्रेशन केल्याचे दिसत आहे. या फोटोंमध्ये रुचिरा निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुप सुंदर दिसत होती. रुचिराच्या चाहत्यांमध्ये रोहीत तिला शुभेच्छा देणार का नाही..? यावर चर्चा रंगली होती. मात्र वाढदिवस उलटून गेल्यावर रोहीतने रुचिराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि इतकंच नव्हे तर त्यांच्या रोमँटिक डेटचे फोटो देखील शेअर केले. जे पाहून ते पुन्हा एकत्र आल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला.

रोहीत आणि रुचिरा यांनी एका भव्य विलामध्ये हि रोमॅंटीक डेट एन्जॉय केली. ‘Its Your Special Day, Happy Birthday To You’ अशा शब्दात रोहितने रुचिराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना रोहीतने रुचिरासोबतचा रोमॅंटीक फोटो पोस्ट केलाय आणि खाली एका छोट्या बॉक्समध्ये लिहिलंय, ‘Last but Special Entry (शेवटी आलोय पण स्पेशल आलोय)’.

त्यांच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. बिग बॉस मराठी ४ मध्ये रुचिरा जाधव आणि तिचा बॉयफ्रेंड रोहित शिंदे यांच्यात भांडण झाले होते. त्यांचं एव्हढं बिनसलं होतं कि आता पुढे पुन्हा एकमेकांना कधीच भेटणार नाही असे चित्र उभे राहिले होते. मात्र आता त्यांच्यातील भांडण मिटत असल्याचे पाहून त्यांचे चाहते पॅचअपची वाट पाहत आहेत.