Rinku Rajguru | लाल इश्क ! लाल रंगाच्या ड्रेसमधील रिंकू राजगुरूचे फोटो व्हायरल, शिव ठाकरेचे कमेंट ठरतीये लक्षवेधी


Rinku Rajguru | सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. तिने अगदी कमी वेळात तिची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. या चित्रपटातून तिला आर्ची या नावाने चांगलीच ओळख मिळाली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम करून तिची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. रिंकू ही चित्रपटांशिवाय सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

नुकतेच रिंकू राजगुरुच्या सोशल मीडियावर काही सुंदर असे फोटो शेअर केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिने लाल कलरचा ड्रेस घालून सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि, ती अत्यंत सुंदर दिसत आहे तर मोठ्या रिंगा कानात घातलेले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे.

हेही वाचा – सईबाई, काय हे बाई..? अभिनेत्रीचा नवा लूक पाहून नेटकरी म्हणाले, ‘हि बघा मराठी उर्फी..’

तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडलेले आहे. अनेक जण या फोटोवर कमेंट करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहे. त्याचप्रमाणे अभिनेता शिव ठाकरे यांनी देखील हिच्या फोटोवर कमेंट केली आहे. त्याने रिंकूच्या या फोटोवर फायर इमोजी पोस्ट केलेली आहे.

रिंकू नुकते झिम्मा 2 या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिचे तान्या आहे पात्र चांगलेच गाजले आणि प्रेक्षकांना तिचे हे पात्र खूप आवडले आहे.